घणसोली गावात म.रा.वि.वि.कं.चे कार्यकारी अभियंता व नगरसेविका यांचा पहाणी दौरा
दिपक देशमुख
नवी मुंबई : घणसोली गावातील नेहमीच भेडसावणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा व विद्युत वाहिन्या वारंवार तुटून पडणे,गेल्या आठवड्यात सुरु विद्युत वाहीनी तुटून पडल्याने एका कुत्र्याला आपला प्राण गमवावा लागला व एका लहान मुलगी जिव मुठीत घेवुन पळाल्याने सुदैवाने तिचा प्राण वाचला. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता, घणसोली गावच्या नगरसेविका सौ. शोभा दिपक पाटील यांच्या पुढाराने गावातील गृहीनींनी ३० जुलै रोजी वाशी येथिल म.रा.वि.वि.कं.च्या कार्यालयात जावुन अधिक्षक अभियंता थोरात याच्या दालनात जावुन ह्या दुर्दैवी प्रकाराचा निषेध करीत, असे प्रकार कधी थांबणार,त्यासाठी माणसाला प्राण गमवावा लागेल का? असे प्रश्नांची फैरी झाडल्याने झालेल्या प्रकाराची अधिक्षक अभियंता थोरातांनी म.रा.वि.वि.कं.ची झालेली चुक मान्य केली व दिलगीरी व्यक्त केली. घणसोलीतील नगरसेविका सौ. शोभा दिपक पाटील यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीची दखल मा.अधिक्षक अभियंता मा.थोरात साहेबांनी गंभीर दखल घेतली असुन त्यांनी वाशी कार्यालयातील कार्यकारी अभियंता मा.सुरवाडे साहेबांना घणसोली विद्युत वाहीन्यांची पहाणी करण्याचे आदेश दिल्याने दि.४ आँगस्ट रोजी नगरसेविका सौ. शोभा दिपक पाटील व माजी नगरसेवक दिपक दगडू पाटील यांच्या सोबत कार्यकारी अभियंता सुरवाडे व ऐरोली कनिष्ठ अभियंता घेरडे आणि घणसोलीचे कनिष्ठ अभियंता सचिन पुंड या अधिकार्यासमवेत पाहणी दौरा केला, या पहाणी दौर्याचा अहवाल मा.अधिक्षक अभियंता थोरातंाकडे सादर करुन व विद्युत प्रवाह सुरळीत होण्यासाठी व आशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.