नवी मुंबई /प्रतिनिधी
नवी मुंबईतील युवा सेना पदाधिकार्यांची आढावा बैठक ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य पवन जाधव, कोषाध्यक्ष अमेय घोले, सचिव प्रवीण पाटकर, युवा सेना निरीक्षक वरुण सरदेसाई, माहिती व जनसंपर्क अधिकारी सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वाशी आणि रात्री ८ वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, ऐरोली येथे या बैठका होतील. या बैठकीस ऐरोली व वाशी शहरातील सर्व युवा सेनेच्या युवा अधिकारी, पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे. युवा सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे नमूद केले आहे.
वैभव नाईकांसारखा दमदार आणि कसदार नेतृत्व युवा सेनेच्या नवी मुंबईच्या प्रमुखपदी नियुक्त केल्याने युवा शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून शिवसेनेच्या संघटना बांधणीलाही पोषक वातावरण निर्माण होवू लागले आहे.