* आ.संदीप नाईक यांची मागणी लवकरच पुर्ण होणार
* महानगर गॅस कंपनीने आठ दिवसात सर्व्हे करावे
* पालकमंत्री ना.गणेश नाईक यांचे बैठकीत निर्देश
नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई शहरातील विविध ठिकाणी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने नवी मुंबईतील नागरिकांकरीता गॅस लाईन टाकून सुविधा देण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप नाईक यांनी ठाणे जिल्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडे केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने येत्या आठ दिवसात शहरात गॅस पाईप लाईन टाकण्या संदर्भात सर्व्हे करुन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.नाईक यांनी दिल्या आहेत.त्यामुळे येत्या कालावधीत नवी मुंबईकरांना २४ तास गॅस सेवा उपलब्ध होणार आहे.
ऐरोली मतदार संघाचे आ.संदीप नाईक यांच्याकडे नागरिकांनी पाईप लाईनच्या माध्यमातून घराघरात गॅस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ.नाईक यांनी या संदर्भात ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडे ही सेवा सुरु करण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात आज(ता.७) झालेल्या जनता दरबारात ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या अधिकार्यांची एका बैठक घेतली. या बैठकीला आ.संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गांवडे आणि महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती, उपमुख्य व्यवस्थापक दास, मॅनेजर प्रभाकर तांबे त्याच बरोबर नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरूवारी झालेल्या बैठकीत आ.संदीप नाईक यांनी शहरातील सिडको गावठाण विस्तार योजना परिसरात व माथाडी वसाहतीमध्ये गॅस पुरवठा लाईन टाकण्याबाबत काय कार्यवाही करण्यात येत आहे. त्याच बरोबर ऐरोलीतील नव्याने विकसित होत असलेल्या सेक्टर-२०(ए/बी/सी/डी), घणसोली नोड, कौपरखैरणे सेक्टर-११ मधील नव्याने विकसित होत असलेल्या परिसराकरीता नवीन गॅस जोडणी संदर्भात आ.नाईक यांनी केलेल्या मागणी नुसार महानगर गॅस लिमिडेटने आतापर्यत काय कार्यवाही केली. या संदर्भातील आढावा आ.संदीप नाईक आणि पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी जाणून घेतला. यावेळी शहरातील मागणी करण्यात येत असलेल्या प्रभागाबरोबरच संपुर्ण शहरातील नागरिकांना गॅस पाईप लाईनने गॅस पुरवठा करण्यासंदर्भात येत्या ८ दिवसात सर्व्हे करण्याचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिल्या.या सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर यासाठीच्या सर्व बाबींची पुर्तता करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना.नाईक म्हणाले. त्यामुळे शहरवासियांना गॅस लाईनने गॅस पुरवठा होईल आणि नागरिकांना २४ तास गॅस सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री ना.गणेश नाईक आणि आ.संदीप नाईक यांनी व्यक्त केला.महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती यांनी आ.नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार संबंधीत ठिकाणी गॅस लाईन टाकून नागरिकांकरीता गॅस पुरवठा करण्यासाठी लिमिटेड देखील प्रयत्नशिल असल्याचे स्पष्ट केले.