* पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश
नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबईकरांना महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जीर्णावस्थेतील विद्युत पोल, उघड्या डीपी, खंडीत होणारा विद्युतपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहे. याची महावितरणने तात्काळ दखल घेवून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील, तसेच एमआयडीसी परिसरातील विद्युत विभागाच्या समस्यांची सोडवणूक करावी. त्यासाठी महावितरणने आपली स्वतंत्र यंत्रणा अपडेट करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पालकमंत्री ना. नाईक यांचा जनता दरबार पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंगे्रसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, त्याचबरोबर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईतील गावठाण आणि झोपडपट्ी सारख्या भागालाही २४ तास विद्यृत पुरवठा व्हावा यासाठी आ.संदीप नाईक यांनी अनेकदा महाोवतरणच्या अधिकार्यांशी संवाद त्याच बरोबर लेखी निवेदन सादर करुन पाठपुरावा सुरु केला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी वाशी येथे झालेल्या जनता दरबारात आ. संदीप नाईक यांनी नवी मुंबईत वारंवार खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत व खराब झालेल्या डी.पी. बॉक्स, घरांवरती लोेंबकळत असलेल्या विद्युत तारा या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री ना. नाईक यांनी महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करीत, नवी मुंबईतील महावितरणची संबंधित समस्यांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले. या कामासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रभागवार कार्यरत असणार्या महावितरणच्या अधिकार्यांना सहकार्य करावे, अशा सूचना देखील पालकमंत्री ना. नाईक यांनी दिल्या.