नवी मुंबई : पामबीच मार्गावर असणार्या सारसोळे जेटीवर सारसोळेकर ग्रामस्थांकडून नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे विविध पक्षीय राजकारण्यांचा सहभाग या सारसोळेकरांच्या नारळीपौर्णिमेत असला तरी भाजपा नेत्या माजी आमदार सौ.मंदाताई म्हात्रे आणि युवा सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष वैभव नाईक हेदेखील प्रथमच सारसोळेकरांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले पहावयास मिळाले. वैभव नाईकांच्या रूपाने प्रथमच एक बोनकोडेकरांचा सहभाग सारसोळेकरांच्या उत्सवात झाला असल्याचे पहावयास मिळाले.
नारळीपौर्णिमा नवी मुंबईत ठिकठिकाच्या जेटीवर साजरी होत असली तरी सारसोळेकरांची नारळीपौर्णिमा हा नवी मुंबईत गेल्या काही वर्षापासून आकर्षणाचा विषय बनत चालली आहे. सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून गेल्या काही वर्षापासून कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून नारळीपौर्णिमेला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून सारसोळेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असतात.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोलवाणी मातेच्या मंदीरापासून विधीवत पुजा झाल्यावर ढोलताशाच्या गजरात पालखी सोहळ्यास सुरूवात झाली. होळी मैदानात पालखी आल्यावर सर्वप्रथम माजी आमदार व भाजपा नेत्या सौ.मंदाताई म्हात्रे पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. सारसोळे कोळीवाड्यापासून निघालेला पालखी सोहळा जेटीवर जाण्यास तब्बल अडीच तासाचा कालावधी लागला. सारसोळे ग्रामस्थांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. युवा वर्ग, युवती, महिला,पुरूषांचे नृत्य सुरूच होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयवंत सुतार, पर्यावरणप्रेमी सुकुमार किल्लेदार, भारतीय विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई संघठक सोमनाथ वासकर, युवा सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष वैभव नाईक, स्थायी समिती सदस्य व क्रिडा-सांस्कृतिक सभापती सुरज पाटील, शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील, बेलापुर विधानसभा अध्यक्ष अविनाश सुतार, सिवूड्सचे शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे,मनसे जनहितचे नवी मुंबई अध्यक्ष हाजी शाहनवाझ खान, शाखा ७०चे शाखाप्रमुख बाळू घनवट, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार, शहर चिटणिस गणेश पालवे, विलास चव्हाण, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, समाजसेवक रविंद्र भगत, कैलास पाटील, युवा सेनेचे निखिल मांडवे, स्थानिक शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, कॉंग्रेसचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष दिलीप आमले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे, हेमंत पोमण, राजाभाऊ बोबडे, गौतम शिरवाळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.
जेटीवर पुन्हा पालखीची विधीवत पुजा होवून जेटीवरून लहान होड्या खाडीमध्ये नारळ समर्पित करण्यासाठी रवाना झाल्या. नारळी पौर्णिमेचा उत्सव यशस्वी करण्यासाठी कोलवाणी माता मित्र मंडळ आणि सारसोळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.