नवी मुंबई : सण असो वा उत्सव,पोलिसांना कधी घरी विसावा मिळतच नाही. कायदा व सुव्यवस्था रक्षणासाठी त्यांना सतत ‘ऑन ड्यूटी’ बंदोबस्तावर हजर रहावेच लागते. रक्षाबंधनच्या दिनी पोलिसांना कोणतीही रूखरूख मनात राहू नये याकरीता शिवसेनेच्या सानपाड्यातील महिला रणरागिनींनी स्वरराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा-नेरूळ परिसरातील पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी तसेच पोलिस ठाण्यात जावून राख्या बांधल्या.
स्वरराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे आयएसआय ऍकडमीचे नवी मुंबई कार्यवाह किशोर शेवाळे, शिवसेनेच्या महिला उपशहर संघठक सौ.विद्या पावगे (किर्दत) आणि कृषी उद्योजक तसेच स्वरराज प्रतिष्ठानचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गणेश पावगे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
सानपाडा व नेरूळ पोलिस ठाण्यात ‘ऑन ड्यूटी’ पोलिसांना राख्या बांधण्यात आल्या. तसेच पामबीच मार्गावर सत्संगच्या बंदोबस्ताला असलेले पोलिस ब रस्त्यावर बंदोबस्त असणार्या पोलिसांनाही राख्या बांधण्यात आल्या. मिनल इनरकर, कांचनमाला वाफारे, सुरेखा आहेर, पुनम शिंदे, स्नेहा खोत, सुजाता शिंदे, स्नेहल चव्हाण, सारीका ताजणे यांच्यासह अन्य महिला शिवसैनिकांनी रक्षाबंधनात सहभाग घेतला. सांयकाळी सुरू झालेला हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम रात्री ८.१५ पर्यत सुरू होता. अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन झालेल्या भारावून गेलेल्या पोलिसांनी आपले यानिमित्ताने का होईना रक्षाबंधन झाल्याचे सांगत संबंधित महिला भगिनींचे आभार मानले.