दिपक देशमुख
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने सानपाड्यात आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सराव कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांनी आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये ३३ गोविंदा पथके सहभागी झाल्याने नवी मुंबईकरांना गोविंदाच्या जल्लोषाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
मनविसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष शिरीष पाटील गेली ६ वर्षे दहीहंडी सराव कार्यक्रमाचे सानपाड्यात आयोजन करत असून यंदाचे हे ७वे वर्ष होते. मुंबई, ठाणे , नवी मुंबईतील ३३ गोविंदा पथके या उत्सवात सहभागी झाली. मनविसेच्या या दहीहंडीच्या बोलबाला सर्वत्र असल्याने हा उत्सव पाहण्यासाठी नवी मुंबईकर मोठ्या संख्येने सानपाड्यात जमले होते.
मनसेचे नांदेड संपर्कप्रमुख देवदत्त काळसेकर, मनसेचे नवी मुंबई माजी अध्यक्ष व माजी नगरसेवज जितेंद्र कांबळी, माजी विभाग अध्यक्ष कृष्णा पाटील, मनसेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले, धीरज भोईर, गजानन खबाले, विनोद पार्टे, मनसे जनहितचे नवी मुंबई अध्यक्ष हाजी शाहनवाझ खान, दिगबर पाटील, दत्ता घंगाले, संजय पवार, अविनाश सुतार, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व नवी मुंबईच्या राजकारणात बेलापूरचे भावी आमदार असा बोलबाला होत असलेले विवेक सुतार, जयेश म्हात्रे, प्रेम दुबे यांच्यासह मनसे, मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.
मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांचे काटेकोर व शिस्तबध्द नियोजनामुळे दरवर्षी कोणतेही गालबोट न लागता कोठेही हुल्लडबाजी न होता दहीहंडी उत्सव उत्साहात व जल्लोषात सहभागी होत असल्याचे याहीवर्षी पहावयास मिळाले.