दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ११ ए, येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या जनकल्याण मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी साजरा होणार्या दहीकाला उत्सवात ११ लाख रूपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दहीहंडी फोडणार्यांकडीता प्रथम बक्षिस १ लाख ५१ हजार रूपये व आकर्षक स्मृतीचिन्ह, मानाची हंडी फोडणार्या मंडळास १ लाख १हजार रूपये व आकर्षक स्मृतीचिन्ह, दुसरे पारितोषिक ५१ हजार रूपये व सन्मानचिन्ह, महिला गोविंदा पथकासाठी २५ हजार रूपये व सन्मानचिन्ह व स्थानिक गोविंदा पथकासाठी ११ हजार रूपयेव सन्मानचिन्ह तसेच सलामीसाठी १ हजार १११ पासून ते ५ हजार ५५५ रूपये दिले जाणार असल्याची माहिती या उत्सवाचे आयोजक रविंद्र इथापे यांनी दिली.
दहीहंडी उत्सवात सहभागी होवू इच्छिणार्यांनी उत्सवाचे आयोजक रविंद्र इथापे यांच्याशी ९८२०५५५०४४ या क्रमाकांवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी.