* घणसोलीत सेंेंट्रल पार्कचे भूमीपूूजन
* आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नांतूून सेंेंट्रल पार्कसाठी विशेष निधी
दिपक देशमुख
नवी मुंबई : आपण समाजासाठी केलेली विकास कामे ही जनतेपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून विरोधक समाजामध्ये आणि नागरिकांमध्ये विकास कामांबद्दल गैरसमज पसरवितात. याकरिता आपण केलेली विकास कामे ही जनतेपर्यंत जायला हवीत. कार्यकर्त्यांनी विकास कामांची जनतेला माहिती द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले.
ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नातून घणसोली परिसरात राहणार्या नागरिकांच्या मागणीनुसार सावली गाव येथे सेंट्रल
पार्क साकारणार आहे. त्याचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते रविवारी दिनांक १७ ऑगस्ट २०१४ रोजी झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नातून या पार्कसाठी ४ कोटी रुपयांचा विशेष निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, सभागृह नेते अनंत सुतार, शिक्षण मंडळ सभापती सुधाकर सोनावणे, पाणी पुरवठा समिती सभापती नवीन गवते, विधी समिती सभापती तात्या तेली, ई प्रभाग समिती अध्यक्ष संजय पाटील, नगरसेविका मोनिका पाटील, नगरसेवक चंद्रकांत पाटील, एम. के. मढवी, बाळकृष्ण पाटील, रविकांत पाटील, रामआशिष यादव, नगरसेविका शैला नाथ, कामगार नेते सदाभाऊ थोरात, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, निवृत्ती जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्षा कमलताई पाटील, समाजसेवक प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, राष्ट्रवादी कॉंगे्रस युवक अध्यक्ष जयेश कोंडे, जिल्हा सदस्य जी. एस. पाटील, कोंडिबा तिकोने , शशिकांत राऊत, संदीप म्हात्रे, रामनाथ भोईर, सुरेश पाल, दीपक पाटील, आर्किटेक्ट सोपान प्रभू आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी यावेळी, बोलणार्याची माती विकली जाते आणि न बोलणार्याचे सोने देखील विकले जात नाही, असे सांगून विरोधकांचा समाचार घेतानाच आपण केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. आमदारांबरोबर
आता नगरसेवकांनीही आपल्या विकास कामांना लागावे असा सल्लाही त्यांनी दिला.
याप्रसंगी आ. संदीप नाईक म्हणाले की, नवी मुंबई शहराचा विकास होत असताना या शहराची आणि गावांची ओळख चांगल्या पध्दतीने व्हावी यासाठी स्कूल व्हिजन, गार्डन व्हिजन, तलाव व्हिजन अशी अनेक कल्याणकारी धोरणे पालकमंत्री नामदार गणेश नाईक साहेब यांनी आखली.
त्यामुळे नवी मुंबईची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली. या शहरात अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने राहावयास आले; त्यांच्यामध्ये कोणतीही जात, धर्म, पंथ असा भेदभाव न करता माणुसकी धर्माची शिकवण पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. आज होणारी शहराची प्रगती हे आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. आमदार नाईक पुढे म्हणाले की, या शहराचा विकास होत असताना सिडको प्रशासनाने नागरी सुविधा पुरविल्या नाहीत. यामध्ये रस्ते, पथदिवे, उद्याने, पाणीपुरवठा, वीज, यासारख्या सुविधांपासून घणसोली नोडमधील नागरिकांना वंचित ठेवले. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोने या नोडमधील विकास कामांसाठी ५० कोटी रु.ची तरतूद केली आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार खारघरच्या धर्तीवर घणसोलीमध्ये एक सेंट्रल पार्क उभे राहावे याकरिता पाठपुरावा केला आणि आज त्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते झाला, याचा मला आनंद आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामास साडेचौदा कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. शासनाकडून चार कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करुन घेतल्याची माहिती आमदार नाईक यांनी आपल्या भाषणात दिली.
या सेंट्रल पार्कमुळे महापालिकेचाही आर्थिक लाभ होणार आहे. असे सांगतानाच पार्कमध्ये नवी मुंबई शहरातील आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी प्रतिक शिल्पे असावीत तसेच नवी मुंबईतील स्वतंत्र सैनिकांचे स्मारक या पार्कमध्ये असावे, अशी मागणी आ. संदीप नाईक यांनी पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे याप्रसंगी केली.
नवी मुंबई आणि परिसरातील नागरिक आणि विशेषकरुन लहान मुलांसाठी मनोरंजन, करमणुकीचे तसेच वैज्ञानिक ज्ञानाचे साधन म्हणून हे सेंट्रल पार्क उपयुक्त ठरणार आहे. वायू, अग्नी, जल,जमीन आणि आकाश या पंचतत्वावर आधारित या पार्कची संकल्पना आहे. या सेंट्रल पार्कचे काम पाच टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात भूखंडास कुंपण घालणे, जॉगिंग ट्रॅक तयार करणे, वॉटर टँक बांधणे व पाणीपुरवठा व्यवस्था करणे, रस्ते व पार्किंग व्यवस्था करणे, ऍडमिनिस्ट्रेशन, तिकिटींग, ऍम्पी थिएटर, रिटेल फुड प्लाझाच्या इमारती बांधणे, लॅन्डस्केपिंग, विद्युत कामे करणे इत्यादी कामे प्रस्तावित आहेत.