दिपक देशमुख
नवी मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनी त्यांच्या नावावर होण्यासाठी राज्य शासनाने मानीव अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेयन्स ही स्तुत्य योजना सुरु केली आहे. परंतु या योजनेविषयीची तांत्रिक आणि कायदेशीर माहिती अद्यापही अनेक सोसायट्यांना माहित नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोसायटया पुढे येताना दिसत नाहीत. डीम्ड कन्व्हेयन्स ची प्रक्रिया कशी असते, कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, विकसक अथवा जागा मालक सहकार्य करीत नसेल तर काय करायचे, असे अनेक प्रश्न नागरीकांच्या मनात असतात. बिल्डर व मूळ मालकामध्ये असणार्या वादातून दोघेही पळून गेलेले आहेत. त्यामुळे सदनिकाधारकांना वार्यांवर सोडले आहे, अशी प्रकरणे देखील यापूर्वी समोर आली आहेत. कागदपत्रे नसल्याची कारणे सांगून सिडकोचे कर्मचारी कामे करीत नाहीत. संबंधित अधिकार्यांना भेटून दिले जात नाही. अशा अनेक अडचणी व शंका दूर करण्यासाठी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी डीम्ड कन्व्हेयन्स या मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृहात गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
या मेळाव्यात स्वतः पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आबासाहेब जर्हाड उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शासनाच्या उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच सिडकोच्या उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्या मार्ङ्गत नागरीकांच्या शंकांचे समाधान या शासकीय आणि सिडकोच्या अधिकार्यांकडून करुन घेता येणार आहे. अनेक सोसायटयांनी डीम्ड कन्व्हेयन्ससाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत मात्र काही कारणास्तव त्यांच्या प्रस्तावांच्या मंजुरीमध्ये अडचणी आलेल्या आहेत. अशा सोसायट्यांनी या प्रस्तावांच्या कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहून त्यांच्या अडचणींचे निरसन करुन घ्यावे. या मेळाव्यात सोसायटीतील पदाधिकार्यांनी सकाळी १०.३० वाजता नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या उपयुक्त मार्गदर्शन मेळाव्यास आपण आपल्या सोसायटींच्या पदाधिकार्यांसह उपस्थित राहून या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनतेला केले आहे.