अनुराग वैद्य
नवी मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बेलापुर मतदारसंघातून पक्षसुप्रिमो राज ठाकरे यांनी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि महाराष्ट्राच्या काही भागात युवकांनी जल्लोष साजरा केला. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून गजानन काळेंचा असलेला राज्यातील जनसंपर्क आणि समाजवादी चळवळीतील एक लढवय्या म्हणून काळेंच्या उमेदवारीला राज्याच्या राजकारणात एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.
बेलापुर मतदारसंघातील ना. गणेश नाईक, सौ. मंदाताई म्हात्रे या तगड्या मातब्बर उमेदवारांच्या तुलनेत राज ठाकरे यांनी गोरगरीब घरातील बहूजन वर्गाच्या गजानन काळेंना उमेदवारी देवून खर्या अर्थांने कष्टकरी, चळवळीतील लढवय्याला न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया राज्यभरातून उमटली आहे.
नवी मुंबईतील मनसेला आक्रमक , जनआंदोलनाचा लढवय्या चेहरा मिळवून देण्याचे श्रेय अर्थातच गजानन काळेंनाच जाते. नवी मुंबईतील मुजोर इंग्रजी माध्यमाच्या तसेच कॉन्व्हेंटच्या शाळांना गणेशोत्सवाची सुट्टी देणे गजानन काळेंनीच भाग पाडले. नवी मुंबई म्हणजे निवेदने, तक्रारीच असा प्रशासकीय पातळीवर समज दूर करत जनआंदोलनाची सवय नवी मुंबईकरांना गजानन काळेंनीच लावली.
गोरगरीब गजानन काळे मातब्बरांपुढे कसा टिकणार? निवडणूकीचा खर्च कसा भागविणार? पण गजानन काळेंच्या मित्रांनीच त्यांची समस्या सोडविण्यास पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या खिशातून पाचशे-हजार जमा करत गजानन काळेंचे विद्यार्थी चळवळीतील तसेच समाजवादी विचारसरणीचे सहकारी एकत्रित होवू लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांसाठी विचारमंथनांची बाब होवून बसली आहे.
गजानन काळेंचे राज्यभरात विखुरलेले समाजवादी सहकारी आणि विद्यार्थी चळवळीतील शिलेदार बेलापुरात लवकरच दाखल होणार असल्याने काळेंच्या प्रचाराचा तोफगोळा लवकरच निवडणूक समीकरणे घ(बि)डविण्यास सुरूवात करणार असल्याचा आशावाद मनसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.