अनुराग वैद्य
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघात सहा तगडे मातब्बर उमेदवार उभे राहील्याने लढत रंगतदार व चुरशीची होत असून जुईनगर, नेरूळ, सानपाडा, सीवूड्स, तूर्भे भागात मात्र रिक्षाचालकच कॉंग्रेसचा प्रचार करताना पहावयास करताना पहावयास मिळत आहे. प्रवाशांना रिक्षातून ने-आण करताना कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत यांचा परिचय करून देताना त्यांना मत देण्यासाठी विनवण्या करताना पहावयास मिळत आहे.
शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, सहकार, कामगार क्षेत्रात नामदेव भगत यांचे गेल्या दोन दशकाहून अधिक योगदान असून विधानसभा निवडणूकीत प्रचारादरम्यान त्याचा त्यांना फायदाच होत असलेला पहावयास मिळत आहे.
रिक्षाचालकांचे अन् नामदेव भगत यांचे गेल्या काही वर्षात घरगुती संबंध निर्माण झाल्याने रिक्षाचालक स्वत:हून नामदेव भगत यांचा प्रचार करण्यात पुढाकार घेवू लागले आहेत. नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेने नुकताच नामदेव भगत यांना पाठिंबा जाहीर केला असुन २७५० रिक्षाचालक मालक या सेवाभावी संस्थेचे सदस्य आहेत. रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी नामदेव भगत रात्री-अपरात्री कधीही आमच्या मदतीला धावून येत असल्याने रिक्षाचालक मालकांनी नामदेव भगत यांना समर्थन दिले असल्याची माहिती सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली.
जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, तुर्भे, सानपाडा आदी भागात रिक्षात बसल्यास आपणास नामदेव भगत यांचाच प्रचार होत असलेला पहावयास मिळेल. यावेळी विधानसभा निवडणूकीत प्रथमच कॉंग्रेसचे पंजा निवडणूक चिन्ह असल्याने आम्ही नामदेव भगत यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी दिली. नामदेव भगत यांनी आमच्यासाठी सातत्याने काम केले असल्याने आम्हाला या निवडणूकीत त्यांच्यासाठी काम करणे आणि त्यांना विजयी करणे गरजेचे आहे. नामदेव भगत विधानसभेत गेल्यास आमच्या प्रश्नांना शासनदरबारी वाचा फोडणारा घरातील माणूस शासन दरबारी उपलब्ध होणार असल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या.