सुजित शिंदे
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी शनिवारी चौक सभांच्या माध्यमातून प्रचाराचा झंझाावात निर्माण केला. मतदारसंघाचा विकास घडवून आणणारे नाईक यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करीत त्यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही त्यांना दिली.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि समाजात दहशत निर्माण करणार्या उमेदवारांना पुन्हा एकदा घरी बसविण्याचा निर्धार केल्याच्या प्रतिक्रिया या निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांकडून ऐकू येत होत्या. या चौक सभांमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. नवी मुंबईत केवळ विकासाचीच लाट असल्याचे निवडणूक प्रचाराला मिळालेल्या प्रतिसादावरुन दिसून आले.
नाईक यांच्या चौक सभांमधून भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त,माथाडी, ग्रामस्थ, नोडवासिय, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, उद्योजक, सर्वधर्मिय, सर्वप्रांतिय, विविध सेवाभावी-सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
‘आमचे मत विकासालाच आणि संदीप नाईक यांनाच’ अशी निःसंदिग्ध ग्वाही या सर्व घटकांनी दिली. ऐरोली मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेचे वातावरण कायम राहून शांतता नांदावी, अशी आमची इच्छा असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना कदापी निवडून देणार नाही, असे चौक सभांना गर्दी केलेल्या नागरिकांनी सांगितले. ही लढाई प्रतिगामी शक्तींविरोधात पुरोगामी शक्तींची आहे. मतदारसंघाचा विकास साधणारे नाईक हेच पुन्हा आमचे आमदार असतील, त्यांनीच मतदारसंघाचा कायापालट केला असून आवश्यक नागरी सुविधांसोबतच पायाभूत सुविधा आणि नाट्यगृह, अम्युजमेंट पार्क इत्यादी दूरगामी प्रकल्पांचे काम मार्गी लावले आहे. प्रकल्पग्रस्तांचे, माथाडीेंचे, सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींचे तसेच झोपडपटटीवासिय, माथाडी आदी सर्व घटकांच्या जिव्हाळयाच्या समस्या सोडविल्या आहेत. नाईक यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबतच जनतेनेही कंबर कसली आहे. त्यांच्या गळयात पुन्हा एकदा विजयश्रीची माळ घालून
ऐरोली मतदारसंघात दौडणारा विकासाचा रथ यापुढे गतिमान ठेवणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. गुजराथी, मारवाडी, जैन समाजाचा नाईक यांना मोठ्या संख्येने पाठींबा मिळतो आहे. व्यापारी आणि उद्योजकांना त्यांच्या संकटकाळी वेळोवेळी मदत करण्यासाठी धावून जाणारे संदीप नाईक यांनी एलबीटी टॅक्स दोन टक्क्यावरुन दिड टक्के करुन घेवून घटकांना दिलासा दिला आहे. याची जाणिव व्यापारी आणि उद्योजकांना आहे. रबाळे, गोठिवली, नौसिल नाका, तळवली गाव, घनसोली आदी
भागांमध्ये शनिवारी नाईक यांच्या चौक सभा झाल्या.
आपल्या प्रचाराची सुरुवात त्यांनी प्रभाग क्रमांक २० रबाळे मधील हनुमान
मंदिराजवळील चौकापासून केली. यावेळी महिलांनी औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. चौक सभांमधून जनतेशी संवाद साधताना नाईक म्हणाले की, जनतेने आणि कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून माझ्या नावाला पसंती दिली त्याबददल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. विकासकामे करीत असताना जात, पंथ, धर्म, गाव, शहर, प्रांत असा भेदभाव कधीच केला नाही. सर्व घटकांचा विकास साधला. माणुसकी आणि सर्वधर्मसमभावाची शिकवणूक लोकनेते गणेश नाईक यांनी आम्हाला दिली आहे. संदीप नाईक पुढे म्हणाले की, शेजारील ठाणे, मुंबई आदी शहरांशी तुलना केली तर नवी मुंबई शहर प्रगतीमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येते. आपण केलेल्या विकास कामांचे श्रेय विरोधक घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नागरिक आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत आपण केलेली विकास कामे पोहोचवली पाहिजेत. मतदारसंघाचा विकास जनतेच्या खंबीर पाठींब्यामुळे मला करणे शक्य झाले आहे. आमदार म्हणून पुन्हा संधी मिळाल्यावर ही विकासकामे अधिक जोमाने सुरु करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवून केंद्रातील भाजपाप्रणित सरकारने
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ केली. आम्ही विरोधकांसारखे आश्वासनांचे गाजर दाखवित नाही तर दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे खणखणीत प्रतिपादन त्यांनी केले. संदीप नाईक यांच्या शनिवारी निवडणूक प्रचाराला नागरिकांनी तुफानी प्रतिसाद दिला. उन्हातान्हाची पर्वा न करता नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधला.
** जनतेची विकास कामे करीत असताना जात, पंथ, धर्म, गाव, शहर, प्रांत असा भेदभाव कधीच केला नाही. सर्व घटकांचा विकास साधला. माणुसकी आणि सर्वधर्मसमभावाची शिकवणूक लोकनेते गणेश नाईक यांनी आम्हाला दिली आहे. नवी मुंबई विकासात अग्रेसर आहे. शेजारील ठाणे, मुंबई आदी शहरांशी तुलना केली तर नवी मुंबई शहर प्रगतीमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येते. – संदीप नाईक