सुजित शिंदे
नवी मुंबई : हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीत काल शनिवारी ऐरोली भागात आणि आज रविवारी चिंचपाडा परिसरात विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा उमेदवार संदीप नाईक यांच्या चौक सभा आणि प्रचार फेर्या पार पडल्या. नवी मुंबई शहराचा विकास केला आहे आणि यापुढेही या शहराची प्रगती साधणे हाच आमचा ध्यास आहे, अशी ग्वाही नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली.
रविवारी सकाळी चिंचपाडा, यादव नगर, गवतेवाडी, सुभाषनगर, पंढरीनगर, विष्णूनगर, इलठणपाडा , दिघा आदी भागांमध्ये संदीप नाईक यांची प्रचार फेरी अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी आपल्या आवडत्या उमेदवाराचे फटाके वाजवून स्वागत केले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
उन्हातान्हाची पर्वा न करता अबालवृद्ध आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने या प्रचार फेर्यांमध्ये श्री. नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाला होता. ङ्गहमारा नेता कैसा हो, संदीप नाईक जैसा हो, आमचे मत विकासालाच आणि संदीप नाईक यांनाच अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कोणताही भेदभाव न करता सर्वधमीर्र्यांना एकत्र घेऊन या शहराचा विकास साधला आहे. नवी मुंबईतील जनतेला शांततामय आणि विकसनशील वातावरण दिले आहे. परंतु काही ठिकाणी आपले वर्चस्व आबाधित ठेवण्यासाठी काही गुंडप्रवृत्तीचे लोक दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे लोक नागरिकांना धमक्या देत आहेत. हा दहशतवाद पुन्हा एकदा मिटविण्याची वेळ आली आहे. अशा प्रवृत्तींना जनताच धडा शिकवेल, असे मत संदीप नाईक यांनी चिंचपाडा येथील चौकसभेमध्ये व्यक्त केले, तेव्हा उपस्थितीत हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना सहमती दर्शविली. झोपडपट्टीवासीयांना दमबाजी करून त्यांना बेघर करण्याची तसेच त्यांची रोजीरोटी हिसकावण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. झोपडपट्टी बांधवांनी या धमक्यांना भीक न घालता निर्भयपणे विकासाच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहन संदीप नाईक यांनी याप्रसंगी केले.
ऐरोली आणि परिसरात रविवारी निघालेल्या प्रचार फेर्यांमध्ये प्रचंड जल्लोष होता. संदीप नाईक अंगार है, बाकी सब भंगार आहे, टिकटिक वाजतंय का, विकासाचे घड्याळ घड्याळ, घड्याळ… अशा घोषणांनी श्री. नाईक यांना हजारो नागरिक पाठिंबा दर्शवित होते. ऐरोलीतील प्रत्येक चौकात महिला ज्येष्ठ नागरिक तरूण वर्ग, व्यापारी उद्योजक, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त,
माथाडी कामगार अशा सर्व घटकांचे प्रतिनिधी नाईक यांचे स्वागत करण्यासाठी जमले होते. याप्रसंगी अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धजन पंचायत समिती,जैन संघ आणि मुस्लिम संघाच्यावतीने नाईक यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. येत्या १५ तारखेला घड्याळाचे बटण दाबून नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन सुतार यांनी केले. साई कॉलनी, वीट भट्टी भाग, शिवकॉलनी, साईनाथ वाडी, छत्रपती कॉलनी, ऐरोलीगाव, ऐरोली सेक्टर २०, १९, आणि सेक्टर २ इत्यादी भागात नाईक यांच्या प्रचाराचा झंझावात निर्माण झाला होता. नागरिकांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना नाईक यांनी विकासाच्या मुद्यावरच जनता आपल्याला कौल देईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. काही समाज विघातक प्रवृत्ती नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. ऐरोलीतील प्रचार फेरीप्रसंगी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने युवा वर्गाने बाईक रॅली देखील काढली होती.