* दिवाळे गावातील ग्रामस्थंाचा निर्धार
* जुन्या आठवणींना दिला उजाळा
सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईतील दिवाळे गावाची ओळख आजही ब्रॉस बॅ्रन्ड पथक म्हणून आहे. या गावातील मिठागरांचा संघर्ष असो, बीएमटीसी कर्मचार्यांचा प्रश्न असो, अथवा प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणे असो अशा विविध प्रश्नांची सोडवणूक लोकनेते गणेश नाईक यांनी केली आहे.
रविवार ५ ऑक्टोबर रोजी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत श्री. नाईक यांनी दिवाळे गावातील सर्वात जुन्या छाया कला सर्कलला भेट दिली. यावेळी दिवाळे गावातील ग्रामस्थांनी आपल्या माणसाला अर्थात श्री. नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करण्याचा निर्धार केला.
दिवाळे गावातील छाया कला सर्कलची १९७० साली स्थापना करण्यात आली. आजही छाया सर्कल ब्रॉस ब्रॅन्ड
पथकाची लौकिकता ठाणे जिल्हयातील दुर्गम भागांपर्यत पोहोचली आहे. या सर्कलमध्येच श्री. नाईक यांनी आपले बालपण घालविले आहे. दिवाळे गावातील छाया सर्कलला भेट देऊन आपल्या जुन्या सहकार्यांशी श्री.नाईक यांनी संवाद साधला. आपला मित्र आज आपल्या भेटीला आल्याबद्दल सर्व सहकार्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. श्री.नाईक यांनी देखील दिलखुलासपणे बालपणी मित्रांच्या सहवासात घालविलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘केवळ राजकीय नेता म्हणून या सर्कलशी माझे नाते जोडले नसून ही माणसे माझी आहेत आणि मी त्यांचा आहे ‘, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया या श्री. नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली. दिवाळे गावातील ग्रामस्थांसाठी आजवर आपण अनेक संघर्षही केले आहेत. त्यामुळेच याठिकाणी असणारा प्रत्येक नागरिक हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी नवी मुंबई शहराच्या विकासासाठी लोकनेते नाईक यांनी आजवर दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत आपण आपल्या माणसाला किंबहुना आपल्यातील कुटुंब प्रमुखाला निवडून देऊ, अशी
ग्वाही छाया कला सर्कलचे अध्यक्ष चंद्रकात कोळी यांनी दिली. याप्रसंगी मास्तर आनंद मारुती जोशी, अध्यक्ष चंद्रकांत कोळी, उपाध्यक्ष दत्तात्रेय विष्णू कोळी, सचिव संदीप जगन्नाथ कोळी, खजिनदार मिलिंद ज्ञानेेशर कोळी आणि राजश्री कातकरी, अशोक पाटील आदी सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
** नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ आणि इतर सर्व घटकांचे विविध प्रश्न सोडविले आहेत. यापुढेही या घटकांच्या
विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू.
– लोकनेते गणेश नाईक