नवी मुंबई : बेलापुर मतदारसंघात विधानसभेची निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली असून शिवसेना शाखांशाखामध्ये शिवसैनिक ते शाखाप्रमुख, गटप्रमुख स्वत: उमेदवार असल्यासारखे परिसर पिंजून काढताना पहावयास मिळत आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात शिवसेनेचे शाखाप्रमुख विरेंद्र लगाडेंनीदेखील घरटी जनसंपर्कावर भर दिला असून अन्य पक्षांच्या तुलनेत नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवसेनेच्याच प्रचाराचा धुराळा अधिक उडाल्याचे पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे यांनी नेरूळ सेक्टर सहामध्ये इमारतींमध्ये नाही तर प्रत्येक सदनिकेमध्ये जावून मतदारांशी सुंसवाद साधण्याचा प्रयास केला होता. अन्य पक्षाच्या तुलनेत कॉंग्रेसची बाजू नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव परिसरात भक्कम असल्याचे पहावयास मिळत आहे.गतविधानसभा निवडणूकीत नामदेव भगत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढताना पाचशेहून अधिक मतदान याच प्रभागातून घेतले होते. मनोज मेहेर, दिलीप आमले, संजय धोतरे, कैलास म्हात्रे, सुनील पाटील, वेखंडे आदी मातब्बर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भरणा या मतदारसंघात असून नामदेव भगत यांना नेरूळ नोडमध्ये या प्रभागातून विशेष अपेक्षा आहेत. मनोज मेहेर यांनी गेल्या पावणे पाच वर्षात नेरूळ सेक्टर सहाच्या विकासाकरीता पालिका प्रशासन व जनता दरबारात केलेला पाठपुरावा केल्याचे स्थानिक रहीवाशांनी जवळून पाहिले आहे. पालिका प्रशासनदरवारीदेखील नेरूळ सेक्टर सहा म्हणजे मनोज मेहेर असे समीकरण मनोज मेहेरच्या परिश्रमामुळे निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणूका तोंडावर आल्या असल्याने अन्य पक्षाच्या तुलनेत कॉंग्रेस व शिवसेनाच प्रचार अभियानात परिसर पिंजून काढत असल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेना शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांनी शिवसैनिक व स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांसोबत सातत्याने नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या व खासगी सोसायट्यांमध्ये फिरून विजय नाहटा यांचा प्रचार करत आहेत. नेरूळ सेक्टर सहामध्ये साड्या वाटून, बचत गटाच्या महिलांना पैसे वाटून, सोसायटीच्या पदाधिकार्यांना, युवा मुलांना दारू व पैशाचे वाटप करून मतदान खेचण्याचे प्रयास होत असल्याने कॉंग्रेस, शिवसेना, मनसे नेरूळ सेक्टर सहा परिसरातील घडामोडीवर विशेष लक्ष ठेवून आहे. कॉंग्रेसच्या मनोज मेहेर यांनी ठराविक कार्यकर्त्यांचे विशेष पथक बनवून गैरप्रकार आढळल्यास थेट नेरूळ पोलीस ठाण्यात तसेच कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत यांना संपर्क साधण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. शिवसेना शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे स्वत: मेगाफोन घेवून प्रचार अभियानातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत असल्याने सध्या तरी प्रचारात शिवसेनेचीच आघाडी नेरूळ सेक्टर सहामध्ये पहावयास मिळत आहे.