सुजित शिंदे
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष व बेलापुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गजानन काळे यांच्या बेलापुर परिसरातील प्रचार रॅलीला बेलापुरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३५ वर्षे वयाचा युवक बेलापुर मतदारसंघाचे भवितव्य घडविण्यासाठी आला असल्याचा उत्साह सूर प्रचारादरम्यान बेलापुरातील युवकांकडून आळविला जात असल्याचे पहावयास मिळाले.
आग्रोळी गावातील शंकर मंदीरापासून मनसेच्या गजानन काळेंच्या बेलापुरातील प्रचार अभियानाचा शुभारंभ झाला. प्रचार अभियानामध्ये गजानन काळेंनी पारसिक बँकेचा परिसर, कातकरी वाडी येथील नागरिकांशी सुसंवाद साधला. युवकांशी हस्तांदोलन तर वयोवृध्दांचे चरण स्पर्श करून गजाजन काळेंनी प्रत्यक्ष भेटीत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेच्या प्रचार अभियानामध्ये स्थानिक रहीवाशी उत्स्फूर्त सहभागी झाल्याने परिसरात मनसेचाच धुराळा उडाला असल्याचे पहावयास मिळाले. त्यानंतर सेक्टर १ व पोलीस कॉलनीतील लोकांशी गजाजन काळेंनी सुसंवाद साधला.