विकासाला मत देण्याचे आवाहन
सुजित शिंदे
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रचाराचा झंझावात आज बेलापूर भागात पोहोचला. नवी मुंबईकर जनतेने आत्तापर्यंत विकासालाच आपला कौल दिला आहे. या निवडणुकीत देखील सुज्ञ आणि जागरुक नागरिक शहराचा विकास साधणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच प्रचंड बहुमतांनी निवडून देतील, असा विश्वास लोकनेते नाईक यांनी व्यक्त केला.
सकाळी १० वाजता लोकनेते नाईक यांचा सीबीडी भागात निवडणूक प्रचार सुरु झाला. ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. आयकर कॉलनी, एकता विहार, निलगिरी गार्डन, आग्रोळी गाव, शाहबाज गाव, सीबीडी कॉलनी, सेक्टरचा परिसर अशा सर्व भागांमध्ये लोकनेते नाईक यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रकल्पग्रस्त आणि इतर सर्व घटकांनी गावठाण भागात गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांना संरक्षण मिळवून दिले आहे. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी शासनाकडून मान्य करुन घेतली आहे. झोपडपट्टयांना संरक्षण आणि त्यांच्या विकासाची मागणी मान्य करुन घेतली आहे, असे सांगून भविष्यातही नवी मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही लोकनेते नाईक यांनी चौक सभांमधून दिली. लोकप्रतिनिधी म्हणून लोकनेते नाईक यांनी बेलापूर भागात विकासाची गंगा आणली. ‘आमचे मत गणेश नाईक यांनाच’ अशा प्रतिक्रिया या निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांकडून व्यक्त होत होत्या. स्थानिक, प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, व्यापारी, उद्योजक, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांनी मोठया संख्येने लोकनेते नाईक यांच्या प्रचार फेरीमध्ये सहभाग घेतला.
नगरसेवक साबू डॅनियल, नगरसेविका शैला नाथ, नगरसेविका स्वाती गुरखे, अशोक पाटील, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, राजश्री कातकरी, जे.डी.कोळी, दीनानाथ पाटील, बंडू जोशी आदीं पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.