* कोपरखैरणेतील निवडणूक प्रचार फेरीमध्ये अभूतपूर्व स्वागत
सुजित शिंदे
नवी मुंबई : जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली. नवी मुंबईचा विकास केला आहे आणि यापुढेही या शहराला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी जबरदस्त खात्री ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे युवा उमेदवार संदीप गणेश नाईक यांनी दिली. सोमवार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोपरखैरणे भागात त्यांची निवडणूक प्रचारफेरी निघाली होती. यावेळी नागरिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. विविध वयोगटातील महिला-पुरुष आणि सर्व घटक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करणार्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन श्री. नाईक यांनी या प्रचार फेरीमधून केले.
श्री. नाईक यांची प्रचार फेरी कोपरखैरणे प्रभाग क्र. २७, २८ आणि २९ या भागात काढण्यात आली होती. आपले लाडके उमेदवार संदीप नाईक यांचे चौका-चौकात फटाक्यांच्या आतशबाजीत ढोल ताशांच्या गजरात उत्स्फूर्त
स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले. प्रत्येक प्रभागामध्ये रॅलीत सहभागी होणार्या नागरिकांची संख्या वाढत होती. जमलेल्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्साह पाहून प्रचार रथातून खाली उतरुन श्री. नाईक कार्यकर्त्यांसोबत चालतच रॅलीमधून पुढे मार्गस्थ झाले.
नागरिकांना संबोधित करताना श्री. नाईक यांनी विकासालाच मत देण्याचे आवाहन केले. विरोधकांनी नेहमीच विकास कामांविरोधात जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम केले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
घराणेशाहीचा बिनबुडाचा आरोप आमच्यावर करण्यात येतो. परंतु माझी उमेदवारी ही जनतेच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आहे. मी केलेल्या चांगल्या कामांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे
राष्ट्रीयअध्यक्ष शरदचंद्र पवार आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ ठरवून शहराच्या विकासासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले.
गावातील ग्रामस्थांनी आणि इतर सर्व घटकांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी विधानसभेत अविरत पाठपुरावा केला. या बांधकामांना संरक्षण देण्यास मान्यता मिळविली आहे. खरे तर हा निर्णय अगोदरच झाला असता मात्र केवळ श्रेय घेण्याच्या स्वार्थापोटी कॉंगे्रसच्या धूर्त मंडळींनी त्यात खोडा घातला. राजकीय स्वार्थापोटी आपल्यामध्ये भांडणे लावण्याचे उद्योग ही मंडळी करीत आहे असे सांगून श्री. नाईक यांनी यांच्या भूलथापांना आणि प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले.
कष्टकरी आणि माथाडी कामगारांना विरोधकांकडून अनेक खोटी ओशासने दिली जात आहेत. घरे तोडण्याच्या धमक्या दिल्या जातात. परंतु जोपर्यंत गणेश नाईक आणि संदीप नाईक आहेत तोपर्यंत तुमच्या घरांनाच काय परंतु या घरांच्या एका विटेलाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वास या घटकांना श्री. नाईक यांनी दिला.
ही प्रचार फेरी कोपरखैरणे तीन टाकीजवळून सेक्टर १७ साईबाबा मंदिर, सेक्टर १९ ,कोपरखैरणे गाव, रंजनदेवी मंदिर ,विशाल स्वीट मार्टच्या डाव्या बाजूने सेक्टर १९ ए मार्गे जुना तलाव से २० , गोल्डन पॅलेस नंतर मुख्य रस्त्यावरून सेक्टर २ कडे नेण्यात आली. या प्रचार फेरीमध्ये स्थानिक नगरसेवक ,पदाधिकारी , कार्यकर्ते, महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.