सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला फार मोठी अध्यात्मिक व धार्मिक परंपरा लाभली आहे. येथील गावांमध्येच नव्हे तर शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळाला एक वेगळी अशी ओळख आहे, असे मत ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासून नाईक यांना नागरिकांचे भरघोस समर्थन मिळाले. शेवटच्या टप्प्यात रविवार आणि सोमवारीही हा जोश आणि उत्साह कायम होता.
संत निरंकारी समागमच्या भाविकांची नाईक यांनी भेट घेतली. नवी मुंबईचा विकास होत असताना जात, धर्म, पंथ, गावचा की शहराचा,गरीब की श्रीमंत असा कोणताच भेदभाव न मानता केवळ माणुसकी धर्माचे जतन करून सर्व लोकांना आपलेसे करण्याची शिकवण लोकनेते गणेश नाईक यांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्याच प्रेरणेने ऐरोली विधानसभा क्षेत्रात काम करीत असताना सर्वच नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. आज नवी मुंबई शहरात काही वाईट प्रवृत्तीचे लोक जनमानसात गैरसमज पसरुन काही खोटी आमिषे नागरिकांना देत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला. संत निरंकारी समागमच्या माध्यमातून समाजात कसे वागावे, कसे बोलावे, याचे मार्गदर्शन केले जाते. आपले समाज परिवर्तनाचे कार्य असेच अखंड चालत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी संत निरंकारी समागमच्या मंडळाला दिल्या. सामाजिक संघटनांच्या भेटी देखील नाईक यांनी घेतल्या.
कोपरखैरणेमधील शेतकरी समाज मंदिराच्या सभागृहात नवी मुंबई वाल्मिकी विकास संघाच्यावतीने आयोजित भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुभाष परछा यांनी केले होते. या कार्यक्रमास संदीप नाईक,समाजसेवक ज्ञानेेशर नाईक,नगरसेवक केशव म्हात्रे,सदस्य सशांक गोयंका, मोनू सौदे, अविनाश पाटील, शशिकांत म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संदीप नाईक यांनी सर्वांना महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. वाल्मिकी समाजाच्यावतीने उमेदवार नाईक यांना निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबाही देण्यात आला. नाईक यांनी कोपरखैरणे येथे आयोजित रामलीला सोहळ्यास देखील भेट देऊन येथील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
** कोपरखैरणेतही इको जॉगिंग ट्रॅक निर्माण करणार**
नवी मुंबई शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांना मोकळ्या हवेत ेशास घेता यावा या उद्देशाने शहरामध्ये विविध ठिकाणी उद्यानांची निर्मिती करुन घेतली. ऐरोलीमध्ये स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार इको जॉगिंग ट्रॅक निर्माण केला. नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पक्षांची माहिती, बारा राशी इत्यादी या जॉगिंग ट्रॅकची वैशिष्टये आहेत. याच जॉगिंग टॅ्रकच्या धर्तीवर कोपरखैरणेमध्ये देखील अशाच प्रकारच्या उद्यानाची व जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करावी, अशी मागणी आज सकाळी कोपरखैरणे येथे नागरिकांशी सुसंवाद साधताना संदीप नाईक यांच्याकडे रहिवाशांनी केली. जवळच असणार्या सेक्टर २३ मधील निसर्ग उद्यान आणि जवळील काही उद्यानांना त्यांनी भेटी देऊन त्या उद्यानांचे सुशोभीकरण करणार असल्याचे ओशासन त्यांनी येथील नागरिकांना दिले. आज नवी मुंबई शहरामध्ये अनेक विकास कामे झाली असून यामध्ये आरोग्य ,शिक्षण ,उद्योग व्यवसाय आदींची निर्मिती झाली आहे. केलेल्या विकास कामांच्या जोरावरच जनता मला जिंकून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या १५ ऑक्टोबर रोजी जनता विकासाच्या
बाजूने कौल देईल, असे ते म्हणाले.