अनंतकुमार गवई
नवी मुंबई : सिवूडस सेक्टर ४८ परिसरात १७ डिसेंबरपासून साईराज व्याख्यानमालेस प्रारंभ होत असून २१ डिसेंबरपर्यत ही व्याख्यानमाला चालणार आहे.
साईराज प्रतिष्ठान आयोजित या साईराज व्याख्यामालेचे हे यंदाचे ९वे वर्ष असून स्थानिक नगरसेविका सौ.कविता भरत जाधव यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन केले जाणार आहे.
सिवूडस सेक्टर ४८मधील श्रीगणेश मैदानात ही व्याख्यानमाला भरविण्यात आली असून सांयकाळी ७ ते १० या वेळेत ही व्याख्यानमाला होणार आहे.
१७ डिसेंबर रोजी संतोष एकनाथ पवारांचे एमपीएससी वा अन्य स्पर्धा परिक्षांवर मार्गदर्शन, १८ डिसेंबरला संत साहीत्याच्या अभ्यासिका सौ. कौमुदी गोडबोलेंचे जय जय रघुवीर समर्थवर व्याख्यान, १९ डिसेंबरला प्रसिध्द पंचागकर्ते दा.कृ.सोमण गीता रहस्य आणि सध्याच्या जीवनावर व्याख्यान, २० डिसेंबरला सुप्रसिध्द गजलकार आप्पा ठाकूरांची एक सांज मराठी गझलेची, सुप्रसिध्द कवी अशोक नायगांवकरांच्या कवीता अशी भरगच्च सांस्कृतिक मेजवानी या व्याख्यानमालेतून नवी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबईकरांनी या व्याख्यानमालेत सहभागी होवून ज्ञानसंपदेचा लाभ घ्यावा असे आवाहन साईराज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.