* डॉ.संजीव गणेश नाईक यांचे गौरवोद्गार
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील गोर-गरीब आणि गरजू विद्यार्थ्यासाठी जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-शिक्षण आणि नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यासाठी एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील सराव परीक्षा घेण्यात येत आहे. या सराव परीक्षेत मागील वर्षी प्रथम आलेली विद्यार्थीनी माधवी भोसले बोर्डाच्या परीक्षेत नवी मुंबईतून तृतीय आली होती. त्यामुळे जीवनाच्या वळणावरील महत्त्वाचा टप्पा असणारी ही सराव परीक्षा ज्याप्रमाणे विद्यार्थ्याना दिशा देणारी ठरली आहे त्याच प्रमाणे नवी मुंंबईची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणारी ठरली आहे, असे गौरवोद्गार संजीव नाईक यांनी काढले.
सलग आठव्या वर्षी या सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीच्या मुख्य परीक्षेसाठी विद्याथ्यारना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सक्षम करणारी परीक्षा असा लौकीक या परिक्षेने प्राप्त केला आहे. शनिवार २० डिसेंबर रोजी या सराव परिक्षेचा शुभारंभ तुर्भे गावातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.सी.व्ही.सामंत विद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संजीव नाईक,सराव परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक, परिक्षेचे समन्वयक आणि पालिकेचे सभागृहनेते अनंत सुतार, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेवक मधुकर मुकादम, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष एच.एस.घरत, सचिव बी.के.पाटील, सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरीसर, नांदगुडेसर, इतर मान्यवर, शिक्षकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
दहावीच्या परिक्षेची भीती विद्यार्थ्याच्या मनातून दूर व्हावी, त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक वाढावा त्याचबरोबर चांगल्या गुणांनी विद्यार्थ्यानी उत्तीर्ण होऊन भविष्यात या विद्यार्थ्यांना करियरसाठी चांगले क्षेत्र निवडता येता यावे आणि नवी मुंबईची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या उदात्त भावनेने लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेतून एसएससी सराव परीक्षा सुरु करण्यात आली. २० डिसेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीत ही परीक्षा संपन्न होणार आहे. मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी त्याचबरोबर हिंदी अशा माध्यमांमधून ही परीक्षा होत आहे. यंदाच्या परिक्षेला १३ हजार विद्यार्थी बसले असून नवी मुंबईतील २३ केंद्रांवर ही परीक्षा यशस्वीपणे घेण्यात येत आहे. ५५० हून अधिक शालेय शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले. लोकनेते गणेश नाईक यांनी ८ वर्षापुर्वी सुरु केलेल्या या सराव परीक्षेच्या उपक्रमामागील भूमिका सराव परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी स्पष्ट केली. या परीक्षेच्या निकालातून विद्यार्थ्याना मुख्य परिक्षेला निर्भयतेने सामोरे जाता येते. त्यामुळे ही परीक्षा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-शिक्षण आणि नवी मुंबई शिक्षण संकुलाच्यावतीने आयोजित करण्यात येणारी ही सराव परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यासाठी दिशादर्शक ठरली आहे. बोर्डाच्या मुख्य परिक्षेविषयी विद्यार्थ्याच्या मनात असणारी भीती या सराव परिक्षेतून दूर होते. नवी मुंबईतील शालांत परीक्षेत विद्यार्थ्याच्या निकालाची टक्केवारी या सराव परिक्षेमुळे मागील काही वषार्ंत वाढली आहे, असे सांगून विद्यार्थ्याचा वाढता प्रतिसाद हेच या सराव परिक्षेचे यश असल्याचे आमदार संदीप नाईक म्हणाले.
दहावीच्या बोर्डाप्रमाणेच परिक्षेसाठी अर्ज भरून घेणे, हॉल तिकीटांचे वाटप करणे, वेगवेगळ्या परीक्षा सेंटरची निवड करणे, बोर्डाच्या धर्तीवरील आदर्श प्रश्नपत्रिका तयार करणे, नवी मुंबईच्या विविध शाळांमधील त्या-त्या विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेणे अशा प्रक्रिया पार पाडल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्याना दहावीच्या मुख्य परिक्षेसारख्या वातावरणातच सराव परीक्षा देण्याचा अनुभव मिळतो. सर्व सामान्य कुटूंबातील आणि अनेक गरजू विद्याथ्यारना ही परीक्षा यशाची गुरु किल्ली ठरली आहे, असा विश्वास परिक्षेचे समन्वयक अनंत सूतार यांनी व्यक्त केला.
यावर्षी मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्या विद्याथ्यार्ंना आयपॅड बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर प्रत्येक केंद्रातून प्रथम येणार्या विद्यार्थ्यास प्रत्येकी ५००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक परीक्षार्थीला गुणपत्रिका तसेच सहभागाबाबतचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.