अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ पश्चिममध्ये अद्यावत क्रिकेटसारखे सुसज्ज केलेल्या कुकशेत गावच्या मैदानावर १ जानेवारीपासून खर्या अर्थांने क्रिकेटचा थरार सुरू होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांच्या माध्यमातून ही नववर्षाची भेट दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कुकशेत गावचे युवा ग्रामस्थ आणि कार्यसम्राट नगरसेवक सुरज पाटील यांनी ‘लोकनेता चषक’ आणि ‘नगरसेवक चषक’ आयोजित केला असून १ जानेवारीपासून ते ५ जानेवारीपर्यत कुकशेतच्या मैदानावर हा क्रिकेटचा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
जय गजाजन क्रिकेट क्लब, गांवदेवी क्रिकेट संघ, सुरज मित्र मंडळ सेक्टर १० व कुकशेतचे ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे या क्रिकेट महोत्सवाचे आयोजन केले असून नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते या क्रिकेट महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार डॉ.संजीव नाईक, नवी मुंबईचे ओबामा या नावाने उभ्या महाराष्ट्रात परिचित असणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक यांच्या नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरूवार, दि. १ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता पामबीच मार्गापासून रॅली काढण्यात येणार असून क्रिकेट महोत्सवाचे उद्घाटक लोकनेते गणेश नाईक यांना पामबीच मार्गापासून ते थेट क्रिकेटच्या मैदानापर्यत सन्मानपूर्वक आणले जाणार आहे. यावेळी लेझिम पथकाचे प्रात्यक्षिक, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, नवी मुंबई क्रिकेट परंपरा जोपासणार्या व योगदान देंणार्या नागरिकांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी राष्ट्रगीताच्या समाप्तीनंतर लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते क्रिकेट महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे.
शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासुनच क्रिकेटचे सामने सुरू होणार आहेत. रविवार, दि. ४ जानेवारी रोजी नगरसेवक चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभागातील कुकशेत गाव व एकता, सहयोग, पंचशील, त्रिमूर्ती, अरूणोदय या गृहनिर्माण सोसायटीतील संघामध्ये सामने होणार आहेत. सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी पत्रकार व नगरसेवक संघांत सामना होणार आहे. रात्री ८ वाजता माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या हस्ते व महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण होणार आहे. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सुरज पाटील यांच्या संयोजनात हा क्रिकेट महोत्सव साजरा होत आहे.
नेरूळ व सभोवतालच्या परिसरात क्रिकेटच्या माध्यमातून मतभेद विसरून सर्व समाजबांधवांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी, खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे याच एकमेव प्रामाणिक हेतूने आपण या क्रिकेट महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती कुकशेतचा ढाण्यावाघफेम नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.