सिग्नल न बसविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २-४-६-८ येथील राजीव गांधी पुलालगतच्याच समाधान चौकात सिग्नल बसविण्याची लेखी मागणी भाजपाचे दिलीप तिडके यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. लवकरात लवकर सिग्नल न बसविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तिडके यांनी दिला आहे.
नेरूळ सेक्टर २-४-६-८ येथील समाधान चौकात रस्त्याचे कॉक्रिट काम चालू आहे. सदरचे काम सुरू असताना रस्त्याच्या मध्यभागी भिंत घालण्याचेही काम सुरू आहे. सदरची भिंत घातल्याने नेरूळ सेक्टर २-४-६-८ विभागातील रहीवाशांना येण्या-जाण्याकरीता वळसा घालून जावे लागणार आहे. या रस्त्याच्या सभोवतालच्या परिसरात सर्व बाजूला शाळा-महाविद्यालय असल्याने मुलांना, पालकांना रस्ता ओंलाडण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी सिग्नल बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप तिडके यांनी दिला आहे.