महापालिका आयुक्त दिनेश वाघमारेंचे प्रतिपादन
नवी मुंबई : शहरामध्ये पायाभूत सुविधांप्रमाणेच संस्कृतीची गरज आहे. सांस्कृतिक वारसा जतन होणे शहरासाठी आवश्यक आहे. शहरात कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यही जोमाने होणे गरजेचे असल्याने सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.
श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई कला, क्रिडा महोत्सव – २०१५ चे आयोजन सीबीडी बेलापुर सेक्टर १ येथील सुनील गावसकर मैदानावर करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आयुक्त वाघमारे बोलत होते.
नवी मुंबईत गेली १६ ते १७ वर्षे नवी मुंबई कला, क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून आमदार मंदाताई म्हात्रे खरोखरीच स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे सांगून पालिका आयुक्त दिनेश वाघमारे पुढे म्हणाले की, या महोत्सवातून शहराच्या कला, क्रिडा व संस्कृतीला चालना मिळते. शहराला डायनॅमिक करण्यासाठी अशा महोत्सवाची गरज आहे. या महेात्सवातूनच महिला बचत गटांनाही रोजगार प्राप्त होतो. येथे सर्वसमावेशक स्टॉल असून जनतेचे प्रेम आमदार मंदाताई म्हात्रेंना यापुढेही कायम मिळत रहावे असा आशावाद आयुक्त वाघमारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या नवी मुंबईतील पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांनीही मंदाताईच्या कार्याची प्रशंसा करत सध्याच्या परिस्थितीत शिक्षणामध्ये संस्काराचा समावेश करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडेंनीदेखील आपल्या छोटेखानी भाषणात आमदार मंदाताई म्हात्रेंच्या कार्याचा सुरूवातीपासून ते आतापर्यतच्या कार्याचा आढावा घेतला. अशा महोत्सवामधूनच नवी मुंबई शहराची ओळख कलावंतांची नगरी म्हणून नजीकच्या भविष्यात होईल असा आशावाद देशपांडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या आयोजक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात निवडणूक काळात पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद व त्यांच्या सहकार्यांनी चोख कामगिरी केल्याने कोठेही बोगस मतदान न झाल्याचे सांगत पोलीस आयुक्तांचे आभार मानले. महापालिका आयुक्तांशी भाषणातून संपर्क साधताना मंदाताईंना लोकांना लहान लहान अडचणी भेडसावतात. लहान लहान समस्यांचे निवारण करा. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून द्या. मी तुमच्याकडे सतत लोकांच्या कामासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच येते. व्यक्तिगत माझे काम घेवून मी कधीही कोणाकडे जात नाही व जाणारही नसल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी सामगितले.
महोत्सव आयोजनातून नवी मुंबईतून विविध क्षेत्रात विविध कलावंत निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त करत आमदार मंदाताई म्हात्रेंनी महोत्सव आयोजनाच्या वाटचालीचा व आपल्या कार्याचा अहवाल तसेच आपल्या स्वभावगुणाचे बारकावेही उपस्थितांना सांगितले.
यावेळी के.के.सेठ, डॉ. श्रीमती शर्मिली शंकर, शशी राजपाल, गोविंद करनानी, गुणाबाई सुतार, परवाना या सत्कारमूर्तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, मारूती भोईर, नगरसेविका विजया घरत, रामचंद्र घरत, सुनील होनराव, भगवानराव ढाकणे आदी व्यासपिठावर होते.
भाजपाच्या माजी नगरसेविका वैशाली तिडके, दिलीप तिडके, बाळासाहेब बोरकर, मनोज मेहेर, दत्ता घंगाळे, दिपक म्हात्रे यांच्यासह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते.