नवी मुंबई : आई वत्सला प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडून नेरूळमध्ये रविवार. दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ यादरम्यान राज्यस्तरीय भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन महोत्सव स्पर्धेदरम्यान कला गौरव पुरस्कार वितरण समारंभाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आई वत्सला प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी दिली.
नेरूळ सेक्टर १२ मधील गांवदेवी मंदीराच्या पटांगणात ही राज्य स्तरीय भजन महोत्सव स्पर्धा होणार असून विविध भजनी मंडळे या महोत्सव स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या भजन महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक नामदेव भगत व नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी केले आहे.