अनंतकुमार गवई
नवी मुंबई :हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त शिवसेना नेरूळ पश्चिम विभागाच्या वतीने १९ जानेवारी ते २५ जानेवारीदरम्यान एसएससी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर १२ मधील सारसोळे बस डेपोलगतच्या तेरणा विद्यालयात १९ ते २४ जानेवारीला सांयकाळी ६ ते ९ या वेळेत ही व्याख्यानमाला होणार आहे. २५ जानेवारी व्याख्यानमालेचा समारोप होणार असून सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत ही व्याख्यानमाला असणार आहे. १९ जानेवारीला इंग्रजी, २० जानेवारीला भुगोल, २१ जानेवारीला विज्ञान, २२ जानेवारीला बीजगणित, २३ जानेवारीला इतिहास (समाजशास्त्र), २४ जानेवारीला भूमिती या विषयावर व्याख्यानमाला होणार आहे.
२५ जानेवारीला व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी सकाळी १० ते १ हिंदी व संस्कृत, दुपारी २ ते ५ मराठी आणि त्यानंतर व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख के.एन.म्हात्रे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, विभागप्रमुख सुनील हुंडारे, गणेश घाग, शिवाजी महाडीक, नगरसेवक रतन मांडवे, दिलीप घोडेकर, सतीश रामाणे यांच्यासह शिवसेना शाखाप्रमुख, गटप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, महिला आघाडी, शिवसैनिक परिश्रम करत आहेत.
दहावीच्या मुलांच्या परिक्षा अवघ्या दीड महिन्यावर आलेल्या असताना त्यांचा परिक्षेचा सराव व्हावा आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळावे म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याने नेरूळ व सभोवतालच्या परिसरातील दहावीची परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी केले आहे.