अनंतकुमार गवई
नवी मुंबई : साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ सेक्टर २ परिसरात २१ व २२ जानेवारी रोजी साई भंडार्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमरदीप अपार्टमेंट, आदर्श अपार्टंमेंट, एलआयजीमधील नेरूळ सेक्टर २च्या रस्त्यावर या साईभंडार्याचे आयोजन करण्यात आले असून शिवसेनेचे नगरसेवक रतन मांडवे व शिवसेना उपविभागप्रमुख मनोज चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेली ४ वर्षे या साईभंडार्याचे आयोजन करण्यात येत आहे. साई जनसेवाचे कार्यकर्ते रमेश शिवतरकर, विकास म्हात्रे, सत्यम वेंगुर्लेकर, अमोल धोंडे यांनी जुईनगर ते शिर्डी पदयात्रा करून श्री. साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. या पादुकांचे नेरूळमधील साई भक्तांना दर्शन व्हावे याकरीता पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. २१ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता पादुकांचे पुजन करून पालखी सोहळ्यास सुरूवात होणार आहे. सांयकाळी ६ ते रात्री ९.३० पर्यत नेरूळ पश्चिमेला हा पालखी सोहळा साई भक्तांसाठी आयोजित करण्यात आला आहे. मारूती म्हात्रे व सुरेश मोरे हे यावर्षीचे पालखीचे प्रथम मानकरी आहेत. २२ जानेवारीला सांयकाळी ६ वाजता साई अभिषेक, ७ वाजता महाआरती, ८ ते रात्री उशिरापर्यत साई भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. रमेश शिवतरकर, गौतम पवार, विकास म्हात्रे, सदानंद भुवड, सत्यम वेंगुर्लेकर हे या भंडार्याचे व्यवस्थापक आहेत. नेरूळ सेक्टर २ व ८ मधील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, साई जनसेवाचे कार्यकर्ते या भंडार्यासाठी परिश्रम घेत आहे. नेरूळ व सभोवतालच्या परिसरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने भंडार्यात सहभागी होवून साईसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना उपविभागप्रमुख मनोज चव्हाण यांनी केले आहे.