नवी मुंबई : बिल्डरने चार महिने खोदकाम करून ठेवलेला खड्डा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही बुजविला जात नसल्याची तक्रार भाजपा कार्यकर्त्याकडे येताच भाजपा कार्यकर्त्यांनी जेसीपी लावून खड्डा बुजवित समस्येचे निवारण केले. भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना लोकोपयोगी कामातून ही वाढदिवसाची भेट दिल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
महापालिका प्रभाग ६९ मध्ये नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात राजीव गांधी उड्डाणपुलानजीक महापालिका प्रशासनाची शाळा क्रं. १२ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय आहे. या शाळेच्या बाजूलाच सद्गुरू नरेंद्र महाराज मार्ग आहे. या मार्गाशेजारी असणार्या मोकळ्या भुखंडावर चार महिन्यापूर्वी बिल्डरने बांधकामाकरीता मोेठे खोदकाम करून ठेवले होते. खोदकामासाठी असलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून डासांचा उद्रेकही वाढीस लागला होता. स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजाराचा त्रास सहन करावा लागल्याने हा खड्डा बुजविण्याकरीता शेजारील साईराज अपार्टंमेंटमधील रहीवाशांनी पालिका प्रशासनाने सतत लेखी तक्रारीही केल्या. पालिका प्रशासनाकडून या तक्रारींची दखल न घेतल्याने रहीवाशांनी भाजपा कार्यकर्ते मनोज मेहेर यांच्याशी संपर्क साधला. मनोज मेहेर यांनी तात्काळ जेसीपी आणून खोदकामाचा खड्डा बुजवून सपाटीकरण केले. भाजपा कार्यकर्ते मेहेर यांच्याशी संपर्क साधल्यावर समस्येचे निवारण झाल्याचे समाधान स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
आमच्या मातृतूल्य नेत्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा मंगळवार, दि.२० जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने त्यांना लोकोपयोगी कामातून पक्षाकरीता जनाधार वाढवून शुभेच्छा देण्याचा मी व माझ्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला असल्याची माहिती मनोज मेहेर यांनी दिली.