अनंतकुमार गवई
नवी मुंबई : राज्यकर्त्यांची व लोकप्रतिनिधींची जनकल्याणाची इच्छा प्रबळ असली तरी त्या मतदारसंघाचा कायापालट होण्यास फारसा वेळ लागत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचा ओबामा म्हणून ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांनी मतदारसंघाच्या विकासाबाबत सर्वच क्षेत्रात पाठपुराव्याचे परिश्रम केल्याने या परिश्रमाची विद्युत विभागालाही अखेर दखल घ्यावीच लागली. ऐरोली विधानसभा मतदारसंघात ६८ ठिकाणी महावितरण ट्रान्सफॉर्मस बसविणार असल्याने ऐरोली मतदारसंघातील वीजेची समस्या कायमस्वरूपीच निकाली निघणार आहे.
आमदार संदीप नाईक हे मतदारांशी सुसंवाद या अभियानांतर्गत ऐरोली मतदारसंघाची सातत्याने पायपीट करत असल्याने वॉटर, मीटर व गटर या लहानातल्या लहान समस्येच्या निवारणासाठीही ते पालिका प्रशासन व विद्युत विभाग कार्यालयात संबंधित अधिकार्यांच्या दालनात सातत्याने चपला झिजवित असतात. २००५ ते २०१० या पाच वर्षात महापालिकेच्या तिसर्या सभागृहात नगरसेवक म्हणून पाच वर्षे वावरताना आणि त्यातील तीन वर्षे स्थायी समिती सभापती म्हणून ‘सभापती आपल्या प्रभागात’ या अभियानातून संदीप नाईकांनी नवी मुंबईच्या सर्वच लहानातल्या लहान समस्यांचा अभ्यास केला होता. आमदारकीची पहिली टर्म पाच वर्षे पूर्ण करताना त्यांना ती पायपीट कामाला आली. ऐरोली मतदारसंघातील अधिकांश भाग डोंगराळ व झोपडपट्टीमय असल्याने तेथील वीज हीच महत्वाची समस्या असल्याचे आमदार संदीप नाईकांच्या निदर्शनास आले होते. आमदार संदीप नाईकांकडे आलेल्या वीजेबाबतच्या तक्रारी व मतदारसंघात पायपीट करताना जनतेशी घरटी सुसंवाद साधताना या वीज समस्येचे गांभीर्य त्यांना जवळून पहावयास मिळाले होते. त्याचीच परिणती महावितरणच्या निर्णयात दिसून आली. आमदार संदीप नाईकांचे परिश्रम सार्थकी लागले. त्यामुळे ऐरोली मतदारसंघातील मतदारांची वीज लपंडाव समस्या लवकरच मार्गी लागणार आहे.
ऐरोली मतदारसंघाचे युवा आमदार संदीप नाईक यांच्या अथक प्रयासाने संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी ६८ ट्रान्सफॉर्मस बसविण्यात येणार आहेत. महावितरणने ट्रान्सफॉर्मस बसविण्याविषयी निविदा मागविल्या असून काम पूर्ण झाल्यावर ऐरोली मतदारसंघातील वीजेची समस्या निकाली निघणार आहे.
नवी मुंबईतील बेलापुर मतदारसंघाच्या तुलनेत ऐरोली मतदारसंघात झोपडपट्टी, स्लम विभाग, डोंगराळ परिसर व गावठाण भाग अधिक आहे. मतदारसंघात पायपीट करताना आमदार संदीप नाईकांना झोपडपट्टी परिसरात वीजेच्या लपंडावाची समस्या व त्रस्त झालेले झोपडपट्टीधारक त्यांच्या निदर्शनास आले. झोपडपट्टीधारकांनी वीजेची समस्या सोडविण्याची त्यांच्याकडे सातत्याने मागणी केली. समस्या निवारणासाठी आमदारकीच्या मागील टर्ममध्ये महावितरणच्या अधिकार्यांशी सातत्याने चर्चा करून, बैठका घेवून, निवेदने देवून आमदार नाईकांनी झोपडपट्टी विभागातील वीजेचा लपंडावाची समस्या व तेथील रहीवाशांना होणारा त्रास याचे गांभीर्य त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक वेळा महावितरणच्या अधिकार्यांशी झालेल्या चर्चेत आमदार नाईकांनी उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करण्याबरोबरच झोपडपट्टीधारकांच्या वीज समस्या निवारणासाठी ट्रान्सफॉर्मस बसविण्याची मागणी सातत्याने रेटून धरली. आपल्या स्पेशल सुविधा प्रकल्पांतर्गत ऐरोली मतदारसंघात ६८ ट्रान्सफॉर्मस बसविण्यात येणार आहे. हे ट्रॉन्सफॉर्मस दिघा गाव, बिंदू माधवनगर, एकता विद्यालय, झोपडपट्टी परिसर, एमआयडीसीतील निवासी वस्त्या, रबाले, नोसिल कॉलनी, रबाले, नोसिल कॉलनी, ऐरोली गाव, शिव कॉलनी, घणसोली, तळवली, गोठीवली, महापेसह ऐरोली कॉलनीतील सेक्टर ५, १७,१९,२०, मेघे कॉलेज, डी.के.टॉवर, साई आर्केड, बँक ऑफ इंडिया, रेणबो रायकर, विठा गोविंद, सुरजी धाम, प्रिती कॉम्पलेक्स, शिवप्रसाद, नवी स्मशानभूमी अशा विविध ठिकाणी ट्रान्सफॉर्मस बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० तर दुसर्या टप्प्यात ३८ ट्रान्सफॉर्मस बसविले जाणार आहेत.
आमदार संदीप नाईकांच्या परिश्रमामुळे महावितरण तब्बल ६८ ट्रान्सफॉर्मस बसविले जाणार असल्याने झोपडपट्टीधारकांकडून आमदारांना अभिनंदनाचे फोन तसेच प्रत्यक्ष भेटून आभार मानले जात आहे.