मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : सम्राट स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने नेरूळ सेक्टर सहा परिसरात १८ व १९ जानेवारी रोजी साईभंडार्याचे आयोजन केले असून या भंडार्यास भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी उपस्थित राहणार आहेत.
नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर हा साईभंडारा आयोजित करण्यात आला असून या भंडार्यास पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर व बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. यंदाचे साई भंडारा आयोजनाचे हे सलग सातवे वर्ष आहे.
शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी भंडारा कार्यक्रमांतर्गत श्री. साईबाबांच्या पादुका स्पर्शासाठी शिर्डीला रवाना झाल्या असून रविवार, दि. १८ जानेवारी रोजी संायकाळी ५ ते ९ या वेळेत श्री. साईबाबांच्या पावण स्पर्श पादुकांचा पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सांयकाळी ७ ते रात्री १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील साईभक्तांनी मोठ्या संख्येने या भंडार्यात सहभागी होवून पालखी सोहळ्यात व महाप्रसादात सहभागी होण्याचे आवाहन साई भंडार्याचे संयोजक आदित्य उनावणे यांनी केले आहे.