* आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची गगनाला भरारी
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पतंग उडविण्याकरिता लागतो मजबूत दोरा, विकासाच्या बाबतीत आमच्या नवी मुंबईचा तोरा!, नहीं कटने देंगे ये हमारे विकास की पतंग, जब तक है जान इस नवी मुंबई के संग! अशा गगनभेदी ध्येयाचा वेध घेत ‘जीवनधारा’ प्रस्तुत आणि नवी मुंबई कला व क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषदेने आयोजित केलेला दुसरा आंतरराष्ट ्रीय पतंग महोत्सव कोपरखैरणे येथील हिरवाईचा शालू परिधान केलेल्या निसर्ग उद्यानात मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी कलाप्रेमी नवी मुंबई कलाकारांशी संवाद साधताना लोकनेते गणेश नाईक यांनी पतंग उडविणे आणि कापणे ही पतंगाच्या खेळाची कला आहे. दैनंदिन जीवनाबरोबरच इतर क्षेत्रात देखील तसेच आहे. प्रत्येक क्षेत्रात पतंगासारख्या चढाओढी या होतच असतात यावर मात करण्यासाठी संयम आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, अशी भावना लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केली.
महापौर सागर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात हा एक दिवसीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला ज्ञानेश्वर नाईक, ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, नगरसेवक सुरेश सालदार, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, नगरसेवक अमित मेढकर, नगरसेवक केशव म्हात्रे, नगरसेविका शुभांगी सकपाळ, नगरसेविका सुरेखा इथापे आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर सागर नाईक यांनी पुष्पगुच्छ आणि सामाजिक संदेश देणारा ‘जीवनधारा’चा पतंग देऊन मान्यवरांचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले.
लोकनेते गणेश नाईक यांनी नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जोपासण्याबरोबरच जगण्याच्या प्रवासाचा मार्ग दाखविण्यासाठी ‘जीवनधारा’ मार्गदर्शक ठरेल, असे सांगत ‘जीवनधारा’ ही एक सामाजिक क्रांती घडविणारी पायवाट असल्याचा विश्वास लोकनेते गणेश नाईक यांनी व्ये केला. पतंग हा भारताचा पारंपारिक खेळ आहे. या भारतीय खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हा महोत्सव मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास देखील नाईक यांनी व्ये केला. पतंग महोत्सव हा केवळ महोत्सव नसून पतंगाप्रमाणे नवा काही देणारा आणि भविष्याचा वेध घेणारा महोत्सव असल्याचेही लोकनेते नाईक म्हणाले.
सकाळच्या कोवळ्या उन्हात आकाशाचा वेध घेणारी रंगीबेरंगी पतंगे कोपरखैरणे येथील सेक्टर-२३ मधील निसर्ग उद्यानात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. एकीकडे सूर्याची कोवळी किरणे आणि त्यातूनच अधूनमधून आकाशातून जाणार्या विमानाचा छेद घेणारे विविध पतंग असा नयनरम्य अनुभव नवी मुंबईकर कलाप्रेमींनी या महोत्सवात घेतला. यात १०० हून अधिक प्रकारच्या पतंगांचा समावेश होता. यामध्ये जम्बो पतंग, कार्टून पतंग, कोब्रा काईट, ब्लॅक शार्क, स्टंट पतंग, डेल्टा काईट, ब्राईट काईट, शंभर पतंगांची सेंच्युरी काईट, ड ्रॅगन, स्टंट काईट, मिकी माऊस, बटरफ्लाय, बार्ली काईट, पेंन्विन काईट, टायगर काईट त्याचबरोबर शहीद भगतसिंग, स्वामी विवेकानंद यांचे चित्र असलेल्या स्काय काईटचा समावेश होता.आंतरराष्ट ्रीय दर्जाचे काईट फ्लायर रेस किंग काईट क्लब आणि गोल्डन काईट ३लब यांनी या महोत्सवात रंगीबेरंगी आणि महाकाय अशा पतंगांचा अविष्कार सादर केला. ‘जीवनधारा’च्यावतीने येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लहान मुले तसे हौशी नागरिकांना पतंग आणि फिरकी देखील देण्यात आली होती.बच्चे कंपनीने हिरवाईने नटलेल्या निसर्ग उद्यानात सकाळच्या प्रहरी कोवळ्या उन्हाचा आणि झुळझुळणार्या वार्याचा शिडकावा सोसत पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकाशात एलईडी लाईट पतंगांनी झेप घेतली. शो स्टाईल एलईडी काईट, दी स्काय स्पारकिंग काईट, चंद्र, तारे यांचा वेध घेणार्या आकाशी दिव्यातील पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी निसर्ग उद्यानात मोठी गर्दी केली होती.
या महोत्सवात सायंकाळी उडविलेले ‘एलईडी’ पतंग खास आकर्षण ठरले. एलईडी पतंगांनी सायंकाळच्या वेळी लखलखाट करुन चार चॉंद लावले. या महोत्सवात पतंगप्रेमींना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील कलात्मकतेला वाव देण्यात आला.
प्रतिक्रिया-
* पतंग महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईतील संस्कृती व परंपरेला जोडण्याचे काम नवी मुंबई कला व क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषदेने केले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना जगभरात असणार्या विविध प्रकारच्या पतंगाची ओळख झाली आहे. भारतातून लोप पावत चाललेली संस्कृती खर्या अर्थाने या महोत्सवाने जपली आहे. – संजीव नाईक
* नवी मुंबई कला व क्रीडा संकुलाच्या माध्यमातून नवी मुंबईची संस्कृती आणि परंपरा जोपासली जात आहे. या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद हा स्वागतार्ह आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला पतंगाची माहिती कळेल त्याचबरोबर आपली संस्कृती कशी आहे, याची देखील माहिती मिळेल असा माझा विश्वास आहे. – आमदार संदीप नाईक.
* पतंग महोत्सवात सहभागी झालेल्या नवी मुंबईकर नागरिकांना देशभरातील विविध भागातील संस्कृती दाखविणार्या पतंगांची ओळख होईल. या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहता यापुढे देखील नवी मुंबई शहरात अधिक व्यापक प्रमाणावर आयोजन करण्यावर भर दिला जाईल.- महापौर सागर नाईक,
* नवी मुंबईत होणारा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आम्हाला खूप आवडला.आजच्या संगणकाच्या युगात अशा प्रकारचा पतंग महोत्सव आयोजित केला जातो आणि तोही नवी मुंबई शहरात याचा मला आनंद आहे. – प्रदीप पांचाळ, लंडन येथून आलेले कला प्रेमी.
* नवी मुंबईतील प्रत्येक नागरिक हा एका आपुलकीच्या नात्याने जोडलेला आहे. आकाशात झेप घेणार्या पतंगाप्रमाणे या शहराने विकासात एक भरारी घेतली आहे.‘जीवनधारा’च्या माध्यमातून होणारा महोत्सव भारताची पारंपारिक संस्कृती दाखविणारा महोत्सव ठरेल.
-अरूण अहिरे, सिने निर्माता, निवेदक.
* नवी मुंबईत जीवनधाराच्यावतीने आयोजित केलेला हा पतंग महोत्सव मनमोहक आणि आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख करुन देणारा आहे. संगणकाच्या जगात वावरत असताना आम्हांला विविध रंगी पतंग पाहण्याची अनोखी संधी दिली. त्याबद२ल आयोजकांचे खुप खुप आभार.-पृथ्वी मेहता, नवी मुंबईकर.