सुजित शिंदे -९६१९१९७४४४
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे शिळ-महापे येथे नविन उड्डाणपूल मंजूर होऊन त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्याच प्रयत्नाने या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे कामही पूर्णत्वास आले आहे. या उड्डाणपुलाचा आणि कॉंक्रीटीकरणाच्या कामाचा पाहणीदौरा शुक्रवारी आ. संदीप नाईक यांनी केला. या उड्डाणपुलावर अपघात होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांना याप्रसंगी केल्या.
शिळ-महापे रोडवर सातत्याने वाहतूककोंडी होत होती. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. अडवली, भुतावली येथे तांत्रिक अडचणीमुळे रस्ता रूंदीकरणाचे काम रखडले होते. महापे-एमआयडीसी जं३शन येथे वाहतूककोंडी होत होती. या सर्व समस्यांना वाहन चालक आणि प्रवाशांना सामोरे जावे लागत होते.
या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी आ. नाईक यांच्याकडे निवेदने दिली होती. त्याची गंभीर दखल घेत आ. नाईक यांनी हा प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न, लक्षवेधी स्ाूचना या माध्यमातून मांडून हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शिळ- महापे रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून त्यावर नवीन उड्डाणपूल बांधण्याची मागणी त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडून मान्य करून घेतली. लोकनेते आणि तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयीन स्तरावर आणि जिल्हा नियोजन समितीच्या सभांमध्ये तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, वन विभाग आणि नवी मुंबई महापालिका यांच्या झालेल्या संयु३त बैठकीत आमदार संदीप नाईक यांनी वन विभागाकडून अडवली व भुतवली येथील जागा एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचे मान्य करून घेतले. या कामातील तांत्रिक अडथळा दूर करून रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचा आणि नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
शुक्रवारी आमदार नाईक यांनी केलेल्या पाहणी दौर्यात उड्डाणपुलावर अपघात न होण्याच्या अनुषंगाने दिशादर्शक फलक, रॅम्बलिंग, वेग मर्यादेचे सूचना फलक, दिवाबत्ती अशा उपाययोजना करण्याची सूचना एमएमआरडीएचे उपअभियंता श्री. घाडगे यांना केली. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या खाली अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. दुभाजकांचे सौंदर्यीकरण करून उड्डाणपूल परिसर सुंदर करण्याची सूचना देखील आमदार नाईक यांच्या पाहणीदौर्यात त्यांच्यासोबत नगरसेवक प्रभाकर कांबळे, समाजसेवक रविंद्र बागराव आदी उपस्थित होते.
चौकट
शिळ- महापे रस्त्याचे कॉंक्रीटीकरण झाले आहे तसेच नविन उडडाणपूल देखील पूर्ण होत आला आहे त्यामुळे नागरिकांचा आणि वाहनचालकांचा येथील प्रवास सुरक्षित होईल, अशी आशा आहे. अडवली-भुतवली येथील नियोजित आणि नव्याने सुरू होणार्या पुढील ३.५ किलोमीटरच्या रस्त्याची पाहणी पुढील आठवड्यात करणार आहे.
– आमदार संदीप नाईक