सुजित शिंदे -९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे व कामोठेतील एम.जी.एम रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ सेक्टर २८ परिसरात रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत हा कार्यक्रम नेरूळ (प.) सेक्टर २८ परिसरातील श्रीगणेश सोसायटीत शॉप क्रं. १५ व १६ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. उपमहापौर अशोक गावडे , माजी नगरसेविका सौ. निर्मला गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा संघठक ऍड. सौ. सपना गावडे-गायकवाड हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या शिबिराची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छूकांनी उपमहापौर गावडे यांच्याशी थेट ९८२००७९५९४ या क्रमाकांवर संपर्क साधावा.