नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेचे सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख या स्तरातील पुरूष व महिला व युवा सेना पदाधिकार्यांचा मेळावा नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात गुरूवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात होणारे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरणार आहे. महापालिकेवर निवडणूकीनंतर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना बहूमुल्य मार्गदर्शन या मेळाव्यात होणार असल्याने सर्व पदाधिकार्यांनी वेळेवर मेळाव्याकरीता उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे यांनी केले आहे.