नवी मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयेला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नेरूळ पश्चिम विभागाच्या वतीने रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत हे या कार्यक्रमाचे आयोजक आहे.
आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयेलाचा हा नवी मुंबईतील तिसरा प्रयोग आहे. यापूर्वी बेलापुर व नेरूळ पूर्व विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम नामदेव भगत यांच्या माध्यमातून नेरूळ पश्चिम शिवसेना विभागाने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत. 15 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 5 वाजता नेरूळ सेक्टर 12 मधील श्रीगणेश रामलीला मैदानात या कार्यक्रमास सुरूवात होणार असून याच कार्यक्रमात महिला वर्गासाठी हळदी-कुंकू समारंभाचेही आयोजन केले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक नामदेव भगत यांनी दिली.
आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला हा कार्यक्रम दिवसेंगणिक लोकप्रिय होत असून महिला वर्गात हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमात मजेशीर किस्से, गप्पा,किस्से, गाणी यासह धम्माल संगीतमय परंतु स्पर्धात्मक स्वरूपात चटपटीत प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम असणार आहे. पैठणीसह अन्य बक्षिसांची लयलूट महिला वर्गाला करता येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनांसाठी नामदेव भगत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, गटप्रमुख, शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमात नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.