नवी मुंबई :नेरूळ सेक्टर 12 मधील श्रीगणेश रामलीला मैदानावर आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडियेला कार्यक्रमाला नेरूळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात वाशी ते बेलापूरदरम्यानच्या बारा हजाराच्या आसपास महिला सहभागी झाल्या होत्या. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिवसेना नेरूळ विभागाने आयोजित केलेला हा कार्यक्रम सांयकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यत सुरू होता. श्रीगणेश रामलीला मैदानात झालेल्या खेळ मांडियेला कार्यक्रमास आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने मैदान खचाखच भरले व महिला जमिनीवर बसलेल्या पहावयास मिळाले. सांयकाळी 5 ते 7 यादरम्यान महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. खेळ मांडियेला कार्यक्रमातंर्गत महिलांसाठी होम मिनिस्टरच्या धर्तीवर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी महिलांनाही पारितोषिके देण्यात आली. आयोजक नामदेव भगत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वैशिष्ठय म्हणजे विजेत्या महिलांबरोबरच पराभूत महिलांनाही पारितोषिके देवून गौरविण्यात आले.
अंतिम टप्प्यातील पाच महिलांना पैठणीचे बक्षिस देवून गौरविण्यात आले. सिवूड्स, वाशी, नेरूळ सेक्टर 24, नेरूळ सेक्टर 23, नेरूळ सेक्टर 21 येथील महिलांना अनुक्रमे बक्षिस मिळाले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, के.एन.म्हात्रे, शहरप्रमुख विजय माने, शिवसेना महिला जिल्हा संघठक सौ. रंजनाताई शिंत्रे, शहरसंघठक सौ. रोहीणीताई भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सेनेचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या रणरागिनी असलेल्या महिला कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे आणि नामदेव भगत यांनी सुसंवादातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरेख व शिस्तबध्द नियोजन केल्याबद्दल शिवसेना खासदार विचारे व उपनेते नाहटा यांनी आयोजक नामदेव भगत यांची प्रशंसा केली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक नामदेव भगत यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख विजय माने, शहर संघठक रोहीणी भोईर यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.