संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महाशिवरात्रीच्या उत्सव नवी मुंबईत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येत असला तरी भाविकांमध्ये पामबीच मार्गावरील सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात असणार्या बामनदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने झुंबड उडत असते.
एरव्ही बाराही महिने र्निमनुष्य असणार्या बामणदेवाच्या मार्गावर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी वर्दळ असते. कोणी भाविक पायी पायी तर कोणी वाहनातून बामनदेवाच्या मार्गावर भंडार्यानिमित्त दर्शनाला येतच असतात. सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात असणारा बामणदेव जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात आहे. खाडीअर्ंतगत भागात रात्री-अपरात्री मासेमारी करायला जाताना, तसेच जेटी परिसरात वावरताना बामनदेवच आपले रक्षण करतो, अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची भावना आहे.
बामनदेव हा शिवशंकराचा अवतार. गावातील युवा ग्रामस्थांनी एकत्रित येवून कोलवाणी माता मित्र मंडळाची स्थापना केली. ग्रामस्थांनी पुरातन असलेल्या बामनदेव मंदीराचा जिर्णोध्दार केला. गेल्या ८ वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त खाडीअर्ंतगत भागात बामनदेवाचा भंडारा उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. बामनदेवाकडे जाणारा मार्ग कच्चा व खाचखळग्याचा असल्याने या मार्गाची डागडूजी व्हावी याकरीता गेली ७ वर्षे सारसोळेचा युवा ग्रामस्थ व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर महापालिका ते मंत्रालय तसेच जनता दरबार आदी ठिकाणी आपल्या चपला झिजवित आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सारसोळेच्या ग्रामस्थांकडून महाशिवरात्रीनिमित्त, दि. १७ फेब्रुवारी रोजी बामनदेव भंडार्याचे आयोजन केले आहे. या मार्गाची सारसोळेच्या युवा ग्रामस्थांनी कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली १२ दिवस सफाई केली आहे. बामनदेव हा नवसाला पावणारा असल्याचा प्रत्यय असंख्य भाविकांना सातत्याने आलेला आहे. यामध्ये दिग्गज राजकारण्यांचाही समावेश आहे. सारसोळेकर ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असणार्या बामनदेवाच्या भंडार्यात नवी मुंबईकरांनी सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत मोठ्या संख्येने व भक्तिभावाने सहभागी होण्याचे आवाहन कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी केलेे आहे.