अनंतकुमार गवई
नवी मुंबई : पामबीच मार्गालगत सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेला बामनदेवाचा भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला. या भंडार्यात दहा हजाराच्या आसपास भाविक सहभागी झाले होते.
बेलापुरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे, भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, जयवंत सुतार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, ठाणे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशांत भगत, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने, स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, नगरसेवक रंगनाथ औटी, सुरज पाटील, शिवसेनेचे बबनदादा पाटील, सुकुमार किल्लेदार, शिवाजी महाडीक, शशिकला औटी, विवेक सुतार, अशोक येवले, दिपक शिंदे, विरेंद्र लगाडे, दिलीप आमले, विशाल गुंजाळ, निखिल मांडवे, मनसेचे शहर सचिव संंदीप गलुगडे, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, गणेश पालवे, विलास चव्हाण, योगेश शेटे, अमन गोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हाद पाटील, रविंद्र भगत, तुकाराम टाव्हरे, समाजसेवक आदित्य उनावणे, मनसेचे महादेव पवार, उद्योजक बाळा सरफरे, गौतम शिरवाळे, शरद पाजांरी यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील असंख्य मंडळी भक्तिभावाने या भंडार्यात सहभागी झाली होती.
सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यत हा भंडारा सुरू होता. भंडार्याकरीता सारसोळेच्या ग्रामस्थांनी गेली 15-20 दिवस मेहनत घेतली होती. सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून या भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते.