नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 12 मधील गांवदेवी मंदीरामध्ये हायमस्ट बसविण्याची लेखी मागणी नेरूळ गावच्या नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांनी एका लेखी निवेदनातून महापालिकेच्या अतिरिक्त अभियंत्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. नेरूळ सेक्टर 12 येथील गांवदेवी मंदीरामध्ये दिवसरात्र भाविकांची मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंधूक प्रकाशामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. गांवदेवी मंदीरासमोरील मोकळ्या पटांगणात अखंड हरिनाम सप्ताह, जागरण, किर्तने, प्रवचने, वाढदिवस यासह अन्य धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची नेहमीच रेलचेल असते. या समस्या निवारणासाठी व पुरेशा उजेडासाठी प्रखर झोतातील हायमस्टकरीता सातत्याने लेखी पाठपुरावा करून विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे नगरसेविका सौ. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे. समस्येचे गांभीर्य व भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर गांवदेवी मंदीर आवारात प्रखर प्रकाशझोत बसविण्याची व्यवस्था करण्याची मागणी नगरसेविका सौ. भगत यांनी केली आहे.