संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : एसएससीच्या मुख्य परिक्षेस बसण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणार्या जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती शिक्षण आणि नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परिक्षेचा बक्षिस वितरण शनिवारी पार पडले.
या सराव परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी स्वत: गुणवंत विद्यार्थ्याच्या घरी जावून त्यांना पारितोषिकांचे वितरण केले आणि मुख्य परिक्षेसाठी आणखी धवल यश संपादित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार नाईक यांच्या सोबत परिक्षेचे मुख्य प्रबंधक आणि पालिकेतील सभागृहनेते अनंत सुतार, श्री नांदगुडे सर, श्री म्हात्रे सर, श्री मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
दहावीच्या मुख्य परिक्षेविषयी विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर व्हावी आणि या परिक्षेला अधिक विश्वासाने सामोरे जावून निकालातील त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी लोकनेते गणेश नाईक यांनी एसएससी सराव परिक्षेचा उपक्रम सुरु केला आहे. यावर्षी २० डिसेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीत ही परीक्षा पार पडली. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन माध्यमातून आणि एकूण २४ परिक्षा केंद्रंांवर ही परिक्षा सुरळीत पार पडली. १३ हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. १८ फेब्रुवारी रोजी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आज शनिवारी पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रत्येक माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना आयपॅड, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले आहे. तर २४ परिक्षा केंद्रातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याना प्रत्येकी रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात मराठी माध्यमातून मयूर बब्रुवान अर्जुने (रा.फ.नाईक विद्यालय), अश्विनी तानाजी गडदे (पूणे विद्याभवन हायस्कूल) आणि शेख आयेशा बशिर मुमताज (नवी मुंबई विद्यालय) हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहेत. हिंदी माध्यमातून राणीकुमारी सुरेश पंडीत ( महात्मा गांधी विद्यालय), प्रविण हरिकृष्ण पंडीत (साईनाथ विद्यालय) आणि मशुक इबेनसुद खान (स्वामी विवेकानंद हिंदी विद्यालय) हे विद्यार्थी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी माध्यमातून हर्षल बाजीराव काळे ( राधिकाबाई मेघे विद्यालय), ज्ञानेश्वारी विजय शिंदे (विवेकानंद स्कूल)आणि ज्योतिका जोशी(सेंट झेवियर्स हायस्कूल) या तीन विद्यार्थ्यानी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांने बाजी मारली आहे.
चौकट
जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती शिक्षण आणि नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या संयुक्त विद्यमाने बोर्डाच्या धर्तीवर आयोजित एसएससी सराव परिक्षेला बसणार्या विद्यार्थ्याच्या निकालाची टक्केवारी मुख्य परिक्षेला उंचावली आहे. हा आतापर्यतचा अनुभव आहे. या वर्षी देखील या सराव परिक्षेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. १३ हजार शालांतच्या विद्यार्थ्यानी ही परिक्षा दिली. आता दहावीची मुख्य परीक्षा लवकरच सुरु होणार आहे. या मुख्य परिक्षेतही सर्व विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादीत करावे, यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!
– आमदार संदीप नाईक, (एसएससी सराव परीक्षा आयोजक )