नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर राज्यस्तरीय कुस्त्यांचे मल्लयुध्द रविवार, दि. १ मार्च रोजी रंगणार असून भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सम्राट स्पोटर्स अकॅडमी आयोजित आमदार कुस्ती चषक-२०१५ आमदार मंदाताई म्हात्रे या मल्लयुध्दाच्या आयोजक आहेत. सांयकाळी ४ ते १० या वेळेत हा आमदार कुस्ती चषक चालणार असून या कुस्तीचषकातील मल्लयुध्द पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक आदित्य उनावणे यांनी केले आहे.