नवी मुंबई : नेरूळ गावातील महापालिकेच्या शाळेची दुर्रावस्था आणि नेरूळ गावातील महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राची दुर्रावस्था याबाबत नेरूळ गावातील ज्येष्ठ नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी शहर अभियंत्यांकडे लेखी निवेदनातून साकडे घातले आहे.
महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नेरूळ गावच्या नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांची गणना होत असून सलग तीन वेळा त्या नेरूळ गाव प्रभागातून महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून गेल्या आहेत.
नेरूळ गाव येथील शाळा क्रं. 7 (पूर्वीची 10) च्या समस्यांकडे नगरसेविका भगत यांनी लेखी निवेदनातून शहर अभियंत्यांचे लक्ष वेधले आहे. या शाळेची ईमारत बर्याच वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून या ईमारतीचे ठिकठिकाणचे प्लॉस्टर खराब झालेले आहे. या शाळेतील शौचालयाची दुर्रावस्था झालेली असून शौचालयही खराब झालेले आहे. पावसाळ्यापूर्वी शाळेची दुर्रावस्था न झाल्यास दुर्घटना होण्याची भीती नगरसेविका भगत यांनी व्यक्त केली आहे.
नेरूळगावातील महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राचीही तशीच परिस्थिती असून लवकरात लवकर डागडूजीची गरज आहे. ही ईमारतदेखील बर्याच वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून प्लॉस्टर ठिकठिकाणी खराब झालेले असल्याचे नगरसेविका भगत यांनी नमूद केले आहे.