नवी मुंबई : मराठी विज्ञान परिषदे, मुंबईतर्फे तासकर परिवार विज्ञान कार्यक्रमांर्तगत दरवर्षी काही शाळांना त्यांच्या वाचनालयासाठी पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात येतो. यावर्षी नेरूळमधील एन.आर.भगत इंग्लिश हायस्कूल आणि शिक्षण प्रसारक प्राथमिक शाळेची निवड झाली. यावेळी मराठी विक्षान परिषदेकडून शाळेचे संस्थाचालक नामदेव भगत यांच्याकडे हा संच भेट देण्यात आला. संचालक नामदेव भगत यांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडे तो संच विद्यार्थ्यांसाठी जमा केला.
मंगळवारी दुपारी 12 वाजता हा पुस्तकसंच भेटीचा कार्यक्रम झाला. या संचामध्ये परिषदेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या उपयोगाचीही काही पुस्तके आहेत. शाळेच्या विज्ञान शिक्षकांनाही या पुस्तकांचा उपयोग होणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिथुन पाटील, पत्रकार मच्छिंद्र पाटील, नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, संजय बोरकर, खिस्तेसर आदी मंडळी हजर होती.