संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई कला प्रबोधिनीच्यावतीने २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ‘चित्रदृष्टी’ या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कला प्रबोधिनीचे अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.
वाशी रेल्वेस्थानकासमोरील आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमधील सिडको सभागृहात या चित्रपटमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २६ फेब्रवारीला सकाळी ११ वाजता या महोत्सवाला सुरूवात होत असून २८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या दर्जेदार चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत पोहोचविणे आणि प्रसार माध्यमांतून नवीन पिढीला मराठी चित्रपटांकडे आकर्षित करणे हे कला प्रबोधिनीचे उद्दीष्ठ्य आहे. नवी मुंबई कला प्रबोधिनीच्या माध्यमातून नाट्य, कला, साहीत्य,संगीत तसेच चित्रपट कलेला चालना देवून नवनवीन कलावंतांनाएक व्यासपिठ उपलब्ध करून देणे हे या आयोजनामागील आपले मुख्य ध्येय असल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली.
या चित्रपट महोत्सवामध्ये जे चित्रपट दाखविले जातील, त्यांचे विषय समाजातील विविध घटकांना स्पर्श करणारे असणार आहेत. महत्वाचे म्हणजे अकरापैकी पाच चित्रपट हे येणार्या काळात प्रदर्शित होणारे आहेत. तसेच सहा चित्रपट यापूर्वीच प्रदर्शित झालेले आहेत. नवी मुंबई कला प्रबोधिनीच्या माध्यमातून ‘चित्रसृष्टी’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून शहराला सांस्कृतिक व कलेचा चेहरा देण्याचा आपण प्रयास करत असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.
कलाप्रबोधिनीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून त्यामध्ये बालनाट्यांना प्रोत्साहन देण्याकरीता अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा, वाचन संस्कृती रूजविण्याकरीता पुस्तक प्रदर्शन, साहीत्य संमेलन, संगीत महोत्सव, लघुपट महोत्सव अशा नानविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस आहे. ‘चित्रसृष्टी’ या चित्रपट महोत्सवास नवी मुंबईकरांनी सहकुटंूंब उपस्थित राहील्यास कला प्रबोधिनीच्या सहकार्यांना नजीकच्या काळात भरीव स्वरूपाचे सांस्कृतिक कार्य करण्याची उर्जा मिळेल असा आशावाद गजानन काळे यांनी व्यक्त केला.
*‘चित्रसृष्टी’ चित्रपट महोत्सवामध्ये दाखविले जाणारे चित्रपट*
गुरूवार , दिनांक :- २६ फेब्रुवारी २०१५
* सकाळी ११ ते दुपारी १ – उद्घाटनसत्र
* दुपारी १.१५ ते ३.४५ पर्यत – व्हॉय अबाऊट सावरकर
* दुपारी ४.१५ ते सांयकाळी ६ पर्यत – रेगे
* सांयकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यत – ७-रोशन व्हिला
शुक्रवार, दिनांक :- २७ फेब्रुवारी २०१५
* सकाळी १० ते १२ – बाबांची शाळा
* दुपारी १२.३० ते २.३० – जयजयकार
* दुपारी ३ ते ५ – ब्लॅकबोर्ड
* सांयकाळी ५.१५ ते ७.१५ – अवताराची गोष्ट
* सांयकाळी ७.३० ते ९.३० – सलाम
शनिवार, दिनांक :- २८ फेब्रुवारी २०१५
* सकाळी १० ते दुपारी १२.४५ पर्यत – एक तारा
* दुपारी १.१५ ते ३.१५ पर्यत – काकण
* दुपारी ३.१५ ते सांयकाळी ५.४५ चिरंजिव
* सांयकाळी ७.३० नंतर समारोप कार्यक्रम