संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
भाग १
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रभाग पुर्नरचनेमुळे व आरक्षण सोडतीमुळे राजकीय प्रस्थापितांना हादरे बसले असून नव्याने निर्माण झालेल्या प्रभागाकरीता ‘दादा, मलाच महापालिकेचे तिकीट पाहिजे’ असा हट्ट बोनकोडेचरणी होवू लागल्याने कोणाला गोंेजारावे आणि कोणाला समजावे असे संकट बोनकोडेश्वरांपुढे निर्माण झाले आहे.
गणेश नाईक व त्यांचा परिवार आणि समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करून अन्य पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या दीड महिन्यापासून नवी मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तारीख पर तारीख होत असल्याने राजकीय घटकांचा अपवाद वगळता नवी मुंबईकरांनाही त्यात फारसे स्वारस्य राहीले नसल्याचे आता उघड होवू लागले आहे. दादांनी पक्ष बदलला अथवा नाही बदलला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकांश नगरसेवकांनी आपली राजकीय गणिते सांभाळताना इतर पक्षामध्ये तिकीटसाठी संधान बांधले असल्याचे आता लपून राहीलेले नाही. फक्त दादा भूमिका काय घेतात, यावर संबंधितांची भूमिका अवलंबून असणार आहे.
प्रभाग पुर्नरचनेमुळे व आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या राजकीय अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. वाशी सेक्टर १७ हा बहूचर्चित सध्याचा मतदारसंघ झालेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपत शेवाळे आणि भरत नखाते यांचा प्रभाग एजकत्रित झाल्याने हा मतदारसंघ कोणाला सोडवा या राजकीय संकटाचा सामना बोनकोडेश्वरांना करावा लागणार आहे. या नवीन मतदारसंघात अधिकांश मतदार हे संपत शेवाळेच्या जुन्या प्रभागातील असून भरत नखातेंचे फारसे मतदार या प्रभागात नाहीत. नखाते यांचे ३ हजार तर शेवाळे यांचे साडे सात हजार मतदार या नवीन प्रभागात आले असल्याचे बोलले जात आहे. हा प्रभाग महिलासाठी आरक्षित झाला असून संपत शेवाळे या मतदारसंघावर आपला हक्क सोडण्यास सहजासहजी तयार होणार नाहीत. ते प्रथम सभागृहात नगरसेवक होते. त्यानंतर सलग दोन निवडणूकांमध्ये शेवाळेंना आरक्षणामुळे निवडणूक लढविता आलेली नाही. चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत शेवाळे पुन्हा एकवार निवडून आले. भरत नखाते हेदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाशी नोडमधील ज्येष्ठ नगरसेवक असून बोनकोडेचे कडवट समर्थक म्हणून नखातेंची नवी मुंबईची ओळख आहे. माजी खासदार डॉ. संजीव नाईकांशी नखाते यांची असलेली सलगी शेवाळेंना तिकीट मिळण्यास अडथळा ठरणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर नगरसेवकांमध्ये बोलले जात आहे. हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून शेवाळेंच्या प्रभागात नखाते दांपत्यांचे फलक मोठ्या प्रमाणात प्रथमच लागले होते. प्रभागातील वाद बोनकोडे दरबारी पोहोचला असून बोनकोडे कोणाला गोंजारणार व कोणाला समजावणार याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघातून भाजपाला दणदणीत मताधिक्य मिळाले होते. भाजपातील काही घटक शेवाळे व नखाते वादावर लक्ष ठेवून असेल कोणाला खेचता येईल याचीही चाचपणी सध्या भाजपातील काही घटक करत आहे. या प्रभागातील तिकीट ठरविताना बोनकोेडे आशियानातील ‘रामा’लाही विचारात घेण्याची शक्यता असल्याने त्या निकषावरदेखील तिकीट वाटपाचे पारडे जड ठरण्याची शक्यता आहे. नखाते यांनी अविनाश लाड यांच्या विरोधात अथवा इतरत्र निवडणूक लढवावी असा सूर शेवाळे समर्थकांकडून तर कोपरखैरणे भागात असलेला सातारी टक्का पाहता शेवाळेंनी मातीच्या निकषावर कोपरखैरणेतील एकाद्या प्रभागात नशिब आजमावे असा सूर नखाते समर्थकांकडून आळविला जावू लागला आहे.
उद्या भाग-२
कुकशेत-सारसोळेची पाटीलकी पणाला, दादा देणार उमेदवारी कोणाला?