संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : ऐरोली येथील प्रभाग क्रमांक-१५ मध्ये नवी मुंबईतील पहिला पर्यावरण पुरक जॉगिंग ट्रॅकची उभारणी करुन शहराच्या लौकिकतेत भार घातली आहे. त्यानंतर प्रभागातील जेष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्र साकारले असून त्याचे लोकार्पण आणि विविध नागरी कामाचा शुभारंभ, महिलांसाठी भव्य दिव्य असा हळदी-कूंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आयोजन २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप नाईक यांच्या हस्ते विरंगुळा केंद्राचे लोकार्पण व नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक-१५ चे नगरसेवक अशोक पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रभागात विविध नागरी कामे प्रगतीपथावर आहेत. प्रभागातील जेष्ठ नागरिकांकरीता विरंगुळा केंद्र साकरले असून या विरंगुळा केंद्रात वाचनालय, उच्चतम आसन व्यवस्था, विरंगुळ्यासाठी कॅरमची सुविधा आहे. नवी मुंबईची स्वागत नगरी असलेल्या प्रभाग क्रमांक-१५ मध्ये नागरिकांसाठी जॉगिग ट्रॅक, शौचालय, पदपथ, सोसायटयामध्ये नागरी सुविधा पिण्याचे पाणी अशा सोयी सुविधा नगरसेवक अशोक पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नाने मार्गी लावल्या बद्ल त्यांचे कौतुक केले. ऐरोलीतील प्रभाग क्रमांक-१५ मध्ये आधुनिक दर्जाच्या सुविधा आमदार निधीतून भविष्यात साकारण्याचा मानस आ.नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी आ.संदीप नाईक यांच्या हस्ते नगरसेवक अशोक पाटील यांच्या आतापर्यत सामाजिक आणि विकास कामांचा वेध घेणार्या ‘अशोकपर्व’ या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.प्रभागातील नागरिकांच्यासाठी चांगले काही ना काही करायचे ही माझी धारणा आहे. त्याला सर्व नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे सोयी सुविधा पुर्ण करण्यात यश आल्याची भावना नगरसेवक अशोक पाटील यांनी व्यक्त केली.
प्रभागातील तीन हजाराहून अधिक महिला दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य दिव्य स्वरुपात झालेल्या हळदी-कुंकू समारंभात सहभागी झाल्या होत्या अक्काई महिला मंडळाच्या अध्यक्षा, समाजसेविका संगीता अशोक पाटील यांनी महिलांना वाण दिले. यानिमित्ताने दीपसंध्या या मराठ मोळया संगीत मैफीलाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला नगरसेवक एम.के.मढवी, नगरसेविका विनया मढवी, वॉर्ड अध्यक्षा प्रमिला टेमकर, सतिश काळे, कैलास गायकर, राजश्री पाटील, विकास लांडगे, सदानंद दरेकर जेष्ठ समाजसेवक इथापे आदी मान्यवर हजारो महिला, युवक-युवती सहभागी झाल्या होत्या.