संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव हा परिसर प्रभाग पुर्नरचनेत व आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीमध्ये जाहीर झाल्यावर अनेक कथित-तथाकथित सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी येथून काढता पाय घेतला. पण कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर याला अपवाद ठरले. सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील तुंबलेल्या मल:निस्सारण वाहिन्या व गटारे साफ करून घेण्यासाठी तब्बल आठवडाभर परिश्रम करून घेत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नागरीकांना दिलासा दिला.
सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी आणि त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी मनोज मेहेर यांनी गेल्या काही वर्षात केलेले परिश्रम नवी मुंबईकरांना परिचित झाले आहे. महापालिका,सिडको, मंत्रालय, जनता दरबार, पोलीस मुख्यालय, नेरूळ पालिका विभाग कार्यालय आदी ठिकाणी चपला झिजवून लेखी तक्रारींचा व निवेदनाचा मनोज मेहेर यांनी रतीब घातला.
लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूकीत मनोज मेहेर यांची लोकप्रियता सोशल मिडीयावरही पहावयास मिळाली. कुकशेत व नेरूळमधील काही घटकांनी फेसबुकवर मनोज मेहेर यांनाच टार्गेट केल्याचे सोशल मिडीयावरील कार्यरत नवी मुंबईकरांनाही पहावयास मिळाले. मनोज मेहेर यांच्या फेसबुकवरील संभाषणात काटछाट करून त्यांची प्रतिमाही मलिन करण्याचा अपयशी प्रयास टोपन नावाने फेसबुक चालविणार्यांनी केला. पण सारसोळे गावातील ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांनी मनोज मेहेेरची कामे व परिश्रम जवळून पाहिल्याने मनोज मेहेर यांच्या प्रतिमामलिन करण्याच्या प्रयासाला कुकशेत व नेरूळमधील उद्योगी घटकांना भीक घातली नाही.
मनोज मेहेर सारसोळे गावातून व नेरूळ सेक्टर सहा परिसरातून महापालिका निवडणूकीत हमखास निवडून येणारच अशी सर्वच राजकीय घटकांमध्ये तसेच त्यांच्या नेतेमंडळींमध्येही खासगीत चर्चा झडू लागली होती. दहावीच्या परिक्षा सुरू झाल्याने जाहीर बैठक घेवू नये असे धाडस दाखविल्याने मनोज मेहेर सेक्टर सहामधील पालकमंडळींमध्ये नावारूपाला आले.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीत सर्वप्रथम सारसोळे गाव व सेक्टर सहा परिसरातील काही भागाचा मिळून बनलेल्या 86 या नवीन प्रभागाचे सोडतीत प्रथमच आरक्षण निघाले. अनुसूचित जमातीमधील महिला वर्गासाठी हा प्रभाग आरक्षित झाला. प्रस्थापितांसह अनेक इच्छूकांचे व हवशा-नवशा-गवशांचे चेहरे विष्णूदास भावे नाट्यगृहातच पडलेले पहावयास मिळाले.
प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याचे निश्चित होताच अनेकांनी येथून काढता पाय घेतला. विभागाला कोणी वालीच नसल्याचे अवघ्या आठवडाभरातच स्पष्ट झाले. पण या गोष्टीला अपवाद ठरले ते कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व सारसोळे गावचे युवा ग्रामस्थ मनोज मेहेर. कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील मल:निस्सारण वाहिन्या व गटारे चोकअप झाल्याने गावातील रहीवाशी व सभोवतालच्या गावठाण ईमारतीमधील-साडे बारा टक्के ईमारतीमधील रहीवाशी त्रस्त झाले होते.
रहीवाशांनी मनोज मेहेर यांना समस्या निवारणासाठी साकडे घातले. आम्ही इतरांना ओळखत नाही, फक्त मनोज तुलाच ओळखतो अशा शब्दामध्ये वयस्करांनी मनोज मेहेरला सांगितले. पालिका प्रशासनाकडे तगादा लावून आठवडाभरात मनोज मेहेर यांनी गटारांची सफाई व मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करून घेतली. प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होवूनही रस्त्यावर उभे राहून मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करून घेणारा मनोज मेहेर पुन्हा एकवार सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना पहावयास मिळाला.आरक्षण सोडतीमध्ये नशिबाने मनोज मेहेरची साथ सोडली असली तरी परिश्रमाची मात्र मनोज मेहेरने साथ सोडली नाही.