नवी मुंबई : आई वत्सला प्रतिष्ठानच्यावतीने नेरूळ सेक्टर 12 येथील गांवदेवी मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या श्री.सत्यनारायणाच्या महापुजा दर्शनाला 13 हजाराहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात आठ हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले होते.
मंगळवार, दि. 3 मार्च रोजी आई वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळवासियांकरता गांवदेवी मंदीरात श्री.सत्यनारायणाच्या महापुजेचे व गांवदेवी मंदीराच्या पटांगणात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सत्यनारायणाच्या महापूजेला सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत व नेरूळ गावच्या नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत हे स्वत: बसले होते. दुपारपासून आई वत्सला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत, नगरसेविका इंदूमती भगत, पंकज भगत, प्रतिक भगत, किशोर पाटील यांच्यासह नामदेव भगत यांचे समर्थक, मित्र परिवार, कार्यकर्ते जेवणाच्या आयोजनाची देखरेख करण्यात व्यस्त होते.
श्री.सत्यनारायणाचे व गांवदेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी सांयकाळी 6 वाजल्यानंतर रांगा लागल्या होत्या. नेरूळ गाव, कुकशेत गाव, सारसोळे गाव, सेक्टर 6,10,12,16,18,20,24,28 आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यावर स्नेहभोजनाकडे भाविकांची गर्दी झाली. स्नेहभोजनाचे नियोजन शिस्तबध्दरित्या झाले असल्याने हजारो लोकांच्या पंगती झडत असतानाही कोठेही हुल्लडबाजी पहावयास मिळाली नाही.
शिवसेनेच्या नवी मुंबई महिला शहर संघठक सौ. रंजना शिंत्रे, नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या सौ. सरोज पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, के.एन.म्हात्रे, शिवसेनेचे बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघठक सौ. रोहीणी भोईर, बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अॅकडमीचे नवी मुंबई संयोजक किशोर शेवाळे, नगरसेवक दिलीप घोडेकर, रंगनाथ औटी, रामाशेठ वाघमारे, अमित पाटील, मिथुन पाटील, विभागप्रमुख शिवाजी महाडीक, गणेश घाग, नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलीप आमले, अमर पाटील, गणेश पालवे, गिरीराज दरेकर, योगेश शेटे, शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, बाळू घनवट, संजय चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.