संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : निवडणूका अवघ्या महिनाभरावरच आल्या असल्याने राजकारणातील निवडणूका लढवू पाहणार्या चमकेश घटकांनी होर्डीगच्या माध्यमातून आपली हौस भागविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. नेरूळ पश्चिमेला लागलेल्या होर्डीगपैकी 98 टक्के होर्डीगवर पालिका प्रशासनाच्या परवानगीची पावती नसतानाही महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय कानाडोळा करत आहे. अनधिकृत होर्डीगला आश्रय देणार्या व कानाडोळा करणार्या अतिक्रमण विभागाच्या संबंधित कर्मचारी-अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी नेरूळवासियांकडून केली जावू लागली आहे.
अनधिकृत होर्डीगमुळे महापालिका प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असून नेरूळ पश्चिम परिसराला बकालपणाही प्राप्त झाला आहे. नेरूळ सेक्टर 2,4,6,8,10,12,14,16,16ए,18,18ए,20, 22,24,28, स्टेशन रोड, समाधान चौक, साईबाबा हॉटेल चौक, राजीव गांधी उड्डाणपुलाखालील भाग, सेक्टर सहामधील दर्शन दरबार मार्ग, हनुमान मंदीरासमोरील मैदान, सेक्टर सहा ते 18 पर्यतचा अंर्तगत रस्ता यादरम्यान मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डील लागले आहे.
अनधिकृत होर्डीगमुळे नवी मुंबई शहराला येत असलेल्या बकालपणाबाबत लोकनेते गणेश नाईक यांनी सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमातून जाहीररित्या नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु नेरूळ पश्चिमेला मात्र गणेश नाईकांचे कडवट समर्थक म्हणविणार्या काही घटकांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डीग लावत लोकनेते गणेश नाईक यांच्या नाराजीकडे कानाडोळा केलेला आहे.
अनधिकृत होर्डीग लावणार्यांमध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांचा समावेश असून प्रभाग पुनर्रचनेमुळे तर अनधिकृत होर्डीगच्या संख्येत वाढ झाली असून नेरूळ पश्चिमेला कानाकोपर्यात, पथदीपांवर अनधिकृत होर्डीग मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत. अनधिकृत होर्डीग लावणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी जाहीर करूनही अनधिकृत होडींग लावणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात नेरूळ विभाग कार्यालयाने आजवर चालढकलच केलेली आहे. महापालिका प्रशासनाचा नेरूळ विभागाचा अतिक्रमण विभाग अनधिकृत होर्डीग काढण्यातही उदासिनता दाखवित असल्याने नेरूळ पश्चिमेला जागोजागी बकालपणा आला असून अनधिकृत होर्डीगचे शहर असा या नवी मुंबईचा नव्याने नावलौकीक नावारूपाला आलेला आहे. मध्यंतरी नेरूळ पश्चिमेला लावण्यात आलेल्या एका अनधिकृत होर्डीगवरील एका नगरसेवकाचाच फोटो कोणातरी कापून नेण्याचा उद्योग केला होता.
नेरूळ विभाग कार्यालयाच्या उदासिनतेमुळेच अनधिकृत होर्डीग लावणार्यांचे धाडस वाढीला लागले असून परिसर बकाल होवू लागले आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारेंनी नेरूळ पश्चिमेच्या अनधिकृत होर्डीगमुळे निर्माण झालेल्या बकालपणाविषयी नेरूळ विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी नेरूळवासियांकडून करण्यात येवू लागली आहे.